scorecardresearch

Premium

‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ , गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर

‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

ncp women wing protest against lpg price rise

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जनता महाविद्यालय चौकात आंदोलन केले गेले. आंदोलनकर्त्या महिलांनी ‘बहोत हो गई महगाई की मार, बस करो मोदी सरकार’, ‘गॅस दरवाढ कमी करा’, ‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा >>> ‘राजश्री शाहू’चा रक्तदान शिबीर पंधरवडा , राज्यात ७५ ठिकाणी आयोजन, एक हजार बाटल्या संकलनाचे उद्दिष्ट

narendra modi Supriya sule
“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
Uddhav Thackeray Narendra Modi 2
“मोदी सरकारच्या ‘पार्टनर’ उद्योगपतीचा पर्दाफाश केला तेव्हा…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी गरिबांना मोफत धान्य देऊन, ११५० रुपयाच्या सिलेंडरवर स्वयंपाक करण्यास पंतप्रधानांनी भाग पडल्याची टीका केली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरने हजाराच्या वर आकडा पार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी जुलै, मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा >>> बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्या गावांत पाणी टंचाईची चिन्हे; लाखो ग्रामस्थांची पाण्यासाठी होणार पायपीट !

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे, अशी जोरदार टीका केंद्र सरकारवर केली. गॅस दरवाढ मागे घ्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उईकेंनी दिला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबी उईके जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे पूजा शेरकी, सरस्वती गावंडे, वनिता मावलीकर विधानसभा अध्यक्ष किरण साळवी सहभागी झाल्या होत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp women wing protest against lpg price rise in chandrapur rsj 74 zws

First published on: 02-03-2023 at 17:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×