नागपूर : शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधातील खंडणी वसुलीचे प्रकरण आणि पीएच.डी. करणाऱ्या दोन मुलींच्या छळ प्रकरणावर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मुलींच्या व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांची विदर्भातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते. यावर डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने लक्ष घालून या बैठकीचे आयोजन केले आहे. मार्च, २०२२ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या ‘संशोधन सल्लागार समिती’समोर (आरएसी) लघुशोधप्रबंध सादर करणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा आर्थिक व मानसिक छळ करण्यात आला असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा: सरपंचाने काढली बहिणीची छेड; भावंड पेटून उठले अन् सरपंचाला धु धु धुतले

या विद्यार्थिनींना प्रबंध मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर आता नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती निर्माण करून जनसंवाद विभागातील डॉ. धर्मेश धवनकर यांनी प्राध्यापकांकडून लाखोंची खंडणी वसूल केल्याच्या घटनेबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अन्य विषयांवरही चर्चा होणार आहे. विदर्भातील विविध महाविद्यालये व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मागील काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात विशेष बैठक आयोजित केली आहे. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही सामाजिक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने बुधवारची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई

बैठकीकडून तक्रारकर्त्यांच्या आशा

नागपूर विद्यापीठातील पीएच.डी.च्या दोन संशोधक विद्यार्थिनींना न्याय न देता त्यांनी तक्रार केली म्हणून उलट कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामुळे या गंभीर प्रकरणावर बुधवारी होणाऱ्या राज्य सरकारच्या बैठकीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय डॉ. धवनकर यांच्या प्रकरणावरही ठोस कारवाईचे आदेश देण्याची आशा संबंधित प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe chandrakant patil special meeting case sexual harassment of girlsand dhawankar in nagpur university tmb 01
First published on: 30-11-2022 at 09:10 IST