लोकसत्ता टीम

वर्धा: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ‘नेट’ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही परीक्षा १३ ते १७ जून दरम्यान घेतल्या जाणार आहे. ८३ विषयांसाठी संगणक आधारीत चाचणी पध्दतीने ही परीक्षा होणार. देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठ तसेच शैक्षणीक संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधंनकारक आहे.

upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
MPSC answer key announced News regarding preliminary exam 2024 nagpur news
‘एमपीएससी’: उत्तरतालिका जाहीर; पूर्व परीक्षा २०२४ संदर्भात महत्त्वाची बातमी…
IND vs AUS What Time Does India Australia Day Night Test Match Start Live Streaming and Other Key Details
IND vs AUS: डे-नाईट कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? कसं असणार दिवसाचं वेळापत्रक; वाचा लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स
analysis of semester exam system in higher education in india
सत्र परीक्षा पद्धत नकोच!
MPSC , MPSC 2024 Exam, MPSC 2024 Exam Stalled,
एमपीएससीने दिली परीक्षा रखडण्याची कारणे, म्हणे मराठा आरक्षण…
cet cell announces possible schedule for various entrance exams
सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर… एमएचटी-सीईटी कधी होणार?

जाहीर झालेल्या पत्रकानुसार वाणिज्य, शारीरिक शिक्षण, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयांची परीक्षा १३ जूनला होणार. इंग्रजी, गृहविज्ञान व संस्कृत विषयाची १४ जूनला तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, पर्यावरण विज्ञान या विषयाची १५ जूनला होईल. इतिहास, व्यवस्थापन (व्यवसाय प्रशासन, मार्केटींग, एमजीटी, औद्योगिक संबंध व सहकारी व्यवस्थापन), कायदा या विषयाची १६ जूनला तर संगणक विज्ञान, अनुप्रयोग, हिंदी व समाजशास्त्र या विषयासाठी १७ जूनला परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. परीक्षे विषयीचा सविस्तर तपशील युजीसीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Story img Loader