लोकसत्ता टीम

नागपूर : तीन दिवसांअगोदर माटेनगर ते लक्ष्मीनगर चौकादरम्यान भर रस्त्यात नग्न तरुण-तरुणी फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाला होता. या प्रकरणात आता एक नवीन ‘ट्विस्ट’ आला आहे. त्या नग्न तरुण-तरुणीचे मोबाईलने व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाविरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा व कारचा काहीच संबंध नसतानादेखील त्यांनी बदनामी केल्याचा आरोप कारचालकाने लावला आहे. यावरून इन्स्टाग्राम हॅण्डलर व व्हिडीओ काढणाऱ्याविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

hindenburg research post on india
Hindenburg Research : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Dadar Murder News Update
Dadar Suitcase Murder : दादर सूटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण, अर्शदच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Kolkata Doctor Murder Case
Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड

गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रेमी युगुल रस्त्यावर किंवा चालत्या वाहनात अश्लील चाळे करतानाच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाकडून श्रद्धानंदपेठ चौकाकडे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर नग्नावस्थेत एक तरुणी व तरुण दिसून आले. तरुण फुटपाथच्या शेजारी असलेल्या एका मोडक्या घराकडे निघतो, असे व्हिडिओत दिसले होते. त्यावेळी दोन दुचाकीस्वार युवकांनी मोबाईलने त्यांचा नग्न व्हिडिओ बनविला होता. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट करण्यात आला होता. तसेच अनेक व्हॉट्सअप ग्रूप आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. याबाबत बजाजनगर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

आणखी वाचा-गोंदिया जिल्हयात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू, १३०६ घरांची पडझड

पोलिसांनी व्हिडिओवरून त्या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुण-तरुणीचा शोध लावला. तो तरूण दारु प्यायलेल्या अवस्थेत होता. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. यात एक कार दिसते व अनेकांनी संबंधित कारचालक अंकुश (शिवाजीनगर) याचाच त्यात समावेश असल्याचा समज करून घेतला. प्रत्यक्षात एका हॉटेलचा मालक असलेल्या अंकुशने त्या जागेवर कार पार्क करून ठेवली होती. २७ जुलै रोजी ते मित्रासोबत बाहेर गेले होते. जेवण झाल्यानंतर ते कारमध्ये परतले. कारमध्ये बसलेले असतानाच संबंधित तरुणी व तरुण तेथे पोहोचले. त्यावेळी दुचाकीचालकांनी व्हिडिओ बनविला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अंकुश याला दुसऱ्या दिवशी अनेकांचे फोन आले. यामुळे त्यांना धक्काच बसला.

इंस्टाग्रामवरून व्हिडिओ हटविण्याची मागणी

अंकुशने संबंधित इन्स्टाग्राम हॅण्डलर करुण याच्याशी संपर्क केला व व्हिडिओ पोस्ट हटविण्याची विनंती केली. मात्र करुणने उद्धटपणे वर्तन करीत नकार दिला. या प्रकारामुळे ‘माझी प्रतिमा मलिन झाली,’ असा आरोप करत संबंधित इन्स्टाग्राम हँडलरवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली. पोलिसांनी या प्रकरणात करुण व व्हिडिओ बनविणाऱ्या दुचाकीवरील व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ व ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-भंडारा : गोसीखुर्द धरणाचा डावा कालवा फुटला; शेकडो हेक्टरवरील धान पीक पाण्यात…

तरुण करत होता तरुणीची मनधरणी

रस्त्यावर नग्नावस्थेत तरुणी चालत होती. तिच्या पाठोपाठ तरुणही त्याच अवस्थेत पाठलाग करीत होता. तो तिची मनधरणी करीत होता. तो घरी चल असे म्हणत होता. होता. तरुणी त्याच्यासोबत येण्यास नकार देत होती. यादरम्यान दोघांचाही रस्त्यावर वाद झाला. व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाने बराच वेळ तो प्रकार मोबाईलने रेकॉर्ड केला.