नागपूर : नवजात बाळाची विक्री करणारे उपराजधानीतील रॅकेट गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरचा समावेश असून त्यांच्यासह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. या रॅकेटने तेलंगणा राज्यातील प्राध्यापक दाम्पत्याला 7 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाची विक्री केली होती. डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरीमध्ये ‘क्युअर इट’ नावाने मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा संचालक डॉ. विलास भोयर असून त्याने रुग्णालयातून नवजात बाळ विक्रीचा गोरखदंधा सुरू केला होता. त्याने आतापर्यंत अनेक नवजात बाळांची धनाढय़ दाम्पत्यांना विक्री केल्याची माहिती आहे. त्याच्या या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजीस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी विक्री करण्यात आलेल्या नवजात बाळाला ताब्यात घेतले असून त्या प्राध्यापक दाम्पत्याचीही चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस निरीक्षक कविता इसारकर, मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, मनीष पराये, पल्लवी वंजारी, सायबरचे बलराम झाडोकार, हेमंत थोरात आणि संदीप काळे यांनी ही कारवाई केली.

प्रकरण काय?

गेल्या २८ जानेवारीला एक गर्भवती तरुणी डॉ. विलास भोयरच्या रुग्णालयात आली होती. अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झाली होती. डॉ. भोयरने तिला गर्भपात करण्याऐवजी ७ लाखांत बाळ विक्री करण्याचा सल्ला दिला. पैशाच्या आमिषापोटी तरुणीनेही तयारी दर्शविली. तिने ३ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. डॉ. भोयरने तिला काही लाख रुपये दिले आणि रवाना केले.

अशी उघडकीस आली घटना

तेलंगणामधील एका प्राध्यापक दाम्पत्याला बाळ विकत घ्यायचे होते. त्यांना डॉ. भोयर याने जाळ्यात ओढले.

१० लाख रुपयांमध्ये सौदा झाला. बाळाला जन्म देताच कायदेशीररित्या कागदोपत्री प्राध्यापक दाम्पत्याला बाळाचे आईवडील दाखवण्यात आले. मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून दलाल आणि डॉक्टरमध्ये वाद झाला. त्यामुळे या रॅकेटचा भंडाफोड झाला.

लोकसत्ता इम्पॅक्ट

विशेष म्हणजे, ‘लोकसत्ता’ने दोन दिवसांपूर्वीच उपराजधानीत नवजात बाळ विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लोकसत्ताने हा विषय दोन दिवस लावून धरला. वृत्त प्रकाशित होताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वृत्तांची गंभीर दखल घेत छापेमारी केली.