scorecardresearch

खळबळजनक! उपराजधानीतून थेट पाकिस्तानातील व्यक्तीला ‘व्हाट्स ऍप’वरून संदेश, सतरंजीपुरा भागात ‘एनआयए’चा छापा

पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हाट्स ऍप’वरून संशयास्पद संदेश पाठविल्या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे चार वाजता ‘एनआयए’च्या पथकाने नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात छापा घातला.

NIA
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हाट्स ऍप’वरून संशयास्पद संदेश पाठविल्या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे चार वाजता ‘एनआयए’च्या पथकाने नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात छापा घातला.

हेही वाचा >>>खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या

पथकाने अख्तर रजा मोहम्मद मुक्तार आणि अहमद रजा मोहम्मद मुक्तार यांची चौकशी केल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. या छाप्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. सध्या कुणालाही ताब्यात घेतले नसून पथकाने काही सीमकार्ड ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपासासाठी काही युवकांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानातील व्यक्तीशी नागपुरातून काय बोलणे झाले किंवा कोणत्या प्रकारचा संदेश पाठवण्यात आला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 12:40 IST

संबंधित बातम्या