ninth class girl six months pregnant nagpur adk 83 ssb 93 | Loksatta

नागपूर : नववीची विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

मुलीने प्रियकराचे नाव सांगताच तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ninth class girl pregnant nagpur
नववीची विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती (संग्रहित छायाचित्र)

नववीच्या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यावर तिला पालकांंनी डॉक्टरकडे नेले. ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच तिच्या आईवडिलांनी विचारपूस केली. तिने प्रियकराचे नाव सांगताच तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. विश्वास विनोद समुद्रे (२०, ठक्करग्राम, पाचपावली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) आणि आरोपी विश्वास यांच्यात जुनी ओळख आहे. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्याही नेहमी भेटी होत होत्या. जून २०२२ मध्ये स्विटी घरात एकटी असताना प्रियकर विश्वास घरी आला. घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने तिच्यावर जबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. त्यानंतर तो वारंवार घरी येऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला लागला.

हेही वाचा – नागपूर : नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या महिलेला ध्वजारोहणाचा सन्मान, रायपूर ग्रामपंचायतीचे सकारात्मक पाऊल

हेही वाचा – नागपूर : चक्क वाघाच्या अधिवासात पार्टी करणे महागात पडले

प्रियकराच्या त्रासाला कंटाळलेल्या स्विटीने त्याला संबंधास नकार दिला. त्यामुळे त्याने बदनामी करण्याची धमकी दिला आणि तो सतत तिचे शोषण करू लागला. यामुळे स्विटी गर्भवती झाली. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी विश्वासात घेऊन पीडितेला विचारपूस केली असता विश्वासचे कुकृत्य बाहेर आले. पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विश्वासला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 09:46 IST
Next Story
चक्क वाघाच्या अधिवासात पार्टी करणे महागात पडले