नागपूर : राज्यभरात महिलांची छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत असतानाच राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेले निर्भया पथक मात्र अद्यापही कागदावरच दिसत आहे.

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यात निर्भया पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी राखीव पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी, स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या पथकावर थेट पोलीस महासंचालकांच्या नियंत्रणाची व्यवस्था असायची. जानेवारी २०२२ मध्ये निर्भया पथकाची राज्यभर स्थापना करण्यात आली. हे पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४ बाय ७ कार्यरत असणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता गृहमंत्रालयाच्या आदेशाला अन्य पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. गृहमंत्रालयातून आदेश आल्यामुळे अनेक पोलीस आयुक्तांनी पथकाची स्थापना केली खरी, पण त्यातील सर्व नियुक्त्या कागदोपत्रीच असल्यामुळे या पथकाच्या कार्यप्रणालीवरच संशय निर्माण झाला आहे.

nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
lokmanas
लोकमानस: घोषणांनी, वायद्यांनी राज्याचा विकास होईल?
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
naam foundation
जलसंवर्धनातूनच शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य; देवेंद्र फडणवीस यांचे मत
Satej Patil
राज्यात तिसऱ्या आघाडीचे भवितव्य कठीण; सतेज पाटील
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी
ulhas nadi bachav kruti samiti ask question to state govt over ulhas river pollution
मराठवाड्याला प्रदूषित पाणी देणार का? उल्हास नदी बचाव कृती समितीचा राज्य सरकारला सवाल

हेही वाचा…‘एफडीए’च्या नावावर बनावट पथकाकडून छापेमारी, व्यवसायिकांची लूट

दामिनी पथकच बनले निर्भया पथक

याआधी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि आयुक्तालयात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. काही पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांनी दामिनी पथकालाच कागदोपत्री निर्भया पथकाचे नाव देऊन वेळकाढूपणा केल्याचे समोर आले आहे.

निर्भया पथकाच्या वाहनांचा पोलीस गस्तीसाठी वापर

निर्भया पथकाला मिळालेल्या वाहनांचा पोलिसांच्या नियमित गस्तीसाठी वापर करण्यात येत आहे. मुंबईसारख्या पोलीस दलात तर चक्क राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाच्या वाहनांचा वापर झाला आहे.

हेही वाचा…नागपुरात डॉक्टरांनाही डेंग्यू, चिकनगुनियाचा विळखा

नागपूर शहर पोलीस दलात आधीच दामिनी पथक असल्यामुळे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली नाही. दोन्ही पथकांचे कार्य सारखे आहे. – राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त.