नागपूर : हेल्मेट न घातल्याने अपघात झाल्यास डोक्याला गंभीर इजा होऊ शकते, ज्यामुळे कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. हेल्मेट वापरल्याने अपघाताचा धोका कमी होतो आणि डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतींपासून संरक्षण मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अनेक दुचाकी अपघातांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण हेल्मेट नसणे हेच आहे. सरकारकडूनही अनेकदा हेल्मेट सक्ती केली जाते. महाराष्ट्रात हेल्मेंट सक्ती आहे. मात्र, असे असतानाही अनेकजण हेल्मेट घातल नाही. अपघातामुळे या तरुणांचा जीव धोक्यात येतो. अनेक तरुण त्यामुळे मृत्यूमुखी पडताही दिसून येतात. त्यामुळे दुबाकीवर बसल्यावर हेल्मेट घातल्याशिवाय आता दुचाकीच सुरू होणार नाही, अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करुन डव्हान्स स्मार्ट हेल्मेटचा शोध करण्यात आला आहे.

नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथील काही तरुण अभियांत्रिकी विद्याथ्यांनी विकासित केले आहे. विद्यार्थ्यांनी ही कल्पना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सादर केली असता, अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनय तांत्रिक काम पाहून कौतुक केले आणि पुढील प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले. या विद्यार्थ्यांनी आपली कल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर प्रत्यक्ष सादर केली. त्यांनी या तरुण विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेचे आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, रायडरच्या सोयीसाठी या हेल्मेटमध्ये कूलिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी मागून येणान्या वाहनांना रायडर स्पष्ट विसावा, यासाठी सतत सुरू राहणारी लाल एएचईडी लाईट व्यवस्था केली आहे. त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत मिळेल. द्वितीय वर्षातील यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी असलेले कुमार अनुज खापेकर, गौरंग धकाते, भाविक सावर्कर, धीरज शेरजे, अमोद राय, अथर्व सरवारी आणि चेतन धोले यांनी ही कल्पना प्रा. सम्राट कविश्वर आणि प्रा. आशिष धुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात आणली आहे.

शहरात गेल्या काही वर्षात अपघातांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हेल्मेटमध्ये लावलेले सेन्सर वाहनाच्या इग्निशन सिस्टीमशी वायरलेसरीत्या जोडलेले आहेत. हेल्मेट योग्य प्रकारे घातल्यानंतर इंजिन सुरू होते, अन्यथा इंजिन सुरू होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने हे हेल्मेट अतिशय उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. या अभिनव संकल्पनेचे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. विजय काळबांडे आणि प्राचार्य डॉ. अमोल देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे व नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.