नागपूर : महिला विज्ञान काँग्रेसला उद्योगपती नीता अंबानी येणार म्हणून त्यांना ऐकण्यासाठी साऱ्याच महिला आतुर होत्या. मात्र, त्यांनी पाठ फिरवल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी ऐनवेळी धुरा सांभाळली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आयोजित महिला विज्ञान काँग्रेसला उद्याेजिका व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासह वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, महासचिव डॉ. एस. रामकृष्ण, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महिला विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ. कल्पना पांडे उपस्थित होत्या. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

हेही वाचा >>> सूरजागड मार्गावर नक्षलींनी लावले आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात फलक

महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन वैज्ञानिक डॉ. निशा मेंदरत्ता यांनी केले. महिलांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण व दृष्टिकोन तयार होत आहे. विज्ञानक्षेत्रातही महिलांना प्रोत्साहनाची गरज आहे, असे डॉ. निशा मेंदरत्ता म्हणाल्या. देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत महिलांचे योगदान १८ टक्के असून हे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. दुर्गम भागातील वास्तव्य, शिक्षणासह सोयीसुविधांचा अभाव असताना २२ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयासातून निर्माण केलेली १५३ वाणांच्या बियाण्यांच्या बँकेचा प्रवास राहीबाई पोपेरे यांनी मांडला.

हेही वाचा >>> महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन हळदी-कुंकवाने ! दारासमोरील रांगोळी दुष्टशक्तींना रोखत असल्याचा दावा

अदिती, अरुंधती, लोपामुद्रा, गार्गी या विदूषींनी वेदरचनांमध्ये मोलाचे योगदान देत ज्ञान शाखा भक्कम केली, असे डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या. भारतीय महिलांचे गत वैभव विज्ञान क्षेत्रातही आणावे लागेल. त्यासाठी महिलांनी स्वत्वाची जाणीव व वैज्ञानिकदृष्टीचा अंगीकार करून या क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यात व पर्यायाने देश विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. मातृसत्ता व महिलांचे समाजातील महत्त्वाचे स्थान अधोरेखित करत, महिलांनी येणाऱ्या पिढ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन संक्रमित करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला विज्ञान काँग्रेसच्या व्यासपीठावरून महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व शाश्वत विकासातील सहभाग वाढेल, असा आशावाद डॉ. कल्पना पांडे यांनी मांडला.