अमरावती : आगामी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कुणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही, असा आक्रमक इशारा देत विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल, असे मत आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

स्थानिक मानसरोवर सभागृहात आयोजित समाजमाध्‍यमांचा प्रभाव या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आदी यावेळी उपस्थित होते.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

हेही वाचा – “राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचाच हात”, नितेश राणेंचा आरोप, म्हणाले “नार्को टेस्‍ट करा…”

अमरावती लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. कर्नाटकात अराजकता तयार होत आहे. सत्तांतर झाल्यानंतरचा हा बदल लक्षात घेण्यासारखा असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. समाज माध्‍यमांचा वापर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नऊ वर्षांत केलेल्या कामाचा आलेख हा फार मोठा आहे, असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. काळजीपूर्वक समाजमाध्‍यमांचा वापर करून २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.

हेही वाचा – राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा विस्तार होणार; अकोल्यातील पदवी महाविद्यालय चालू सत्रापासूनच; १६४ पदांसह…

समाजमाध्यमातून सध्‍या अपप्रचार होत आहे. अशा अपप्रचाराला आपण आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना सत्याची बाजू सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. नऊ वर्षांत एकही घोटाळा नसल्याने संपूर्ण विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका त्‍यांनी केली.