नागपूर : मध्य भारतातील शिक्षणाचे हब म्हणून नागपूर विकसीत होत आहे. नागपुरात सध्या अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स), ‘आयआयएम’सह इतरही महत्वाच्या शैक्षणीक संस्था कार्यरत आहे. दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील एका मतदार संघात नवीन शिक्षणाचे केंद्र विकसीत होत असल्याचा दावा केला. नितीन गडकरी कोणत्या मतदार संघाबाबत बोलले, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील दि चिटणवीपूसा सहकारी बँक लिमिटेरच्या नवीन शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी मंचावर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, विदर्भ अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचे रविंद्र दुरूगकर, बंडू तळवेकर, अजय लांबट, मृदूलाताई देशमुख आणि इतरही बँकेशी संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, चिटणवीसपूरा बँक ही खूप जूनी असून त्याचा वेगळा इतिहास आहे. सामान्य लोकांनी एकत्र येत भाग- भांडवल उभारून ही बँक सुरू केली आहे. तीन पिढ्यांपासून बँकेचे नेतृत्व करणाऱ्यांनी उत्कष्ठ काम केल्याने बँक उत्तम कार्य करत आहे. बँकेकडून कर्जपुरवठा, वसुली, ठेवीचे चक्र चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

हल्ली स्पर्धेचे युग आहे. या काळात बँक चालवने खूप कठीन आहे. परंतु चिटणवीस बँकेने उत्तम व्यवहारातून एकीकडे चांगल्या कामाने नफाही कमावला आहे. भरतवाडा परिसरात दाव्या ब्रांचचे उद्घाटनही त्याचाच एक नमुना आहे. पूर्व नागपुरातील भरतवाडा परिसर खूप विकसीत होत आहे. पूर्वी या भागात झोपडपट्टी होती. परंतु आता एकीकडे गांधीबाग, इतवारी पसिरातील व्यापारी या भागात व्यवसायासाठी वळत असून दुसरीकडे चांगले रहिवासीबहुल क्षेत्रही विकसीत होत आहे. त्यामुळे हा भाग आता स्मार्ट सिटी होत आहे.

दरम्यान भांडेवाडीतील डंपींग यार्डही आता संपत चालले आहे. येथे सिंबाॅसीस ही सर्वोच्च शैक्षणीक संस्था सुरू होत असून त्याच्या शेजारीही एक मोठी शैक्षणीक संस्था येत आहे. त्यामुळे पूर्व नागपूर एक नवीन शैक्षणीक केंद्र होऊ बघत आहे. पूर्वी पश्चिम नागपूरकडे शैक्षणीक केंद्र म्हणून बघितले जात होते, असेही गडकरी यांनी सांगितले.

टाटा कंपनीचे कौशल्य प्रशिक्षण…

नागपुरात टाटा कंपनीचे कौशल्य प्रशिक्षणाचे मोठे केंद्र विकसीत केले जात आहे. त्यापैकी पहिले कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र पूर्व नागपुरात सुरू होत आहे. या केंद्रात तरुणांना चांगल्या पद्धतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.