नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता त्यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूबाबत नवे वक्तव्य केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २३ जून १९५३ रोजी श्रीनगर येथील तुरुंगात झालेला मृत्यू हा घातपात असल्याची शंका राजकीय वर्तुळात आहे. आता गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात नव्या चर्चेला पेव फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले गडकरी?
शनिवारी नागपुरातील महाल येथील नक्षत्र सभागृहात ‘भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी’ यांच्यावर आयोजित व्याख्यानात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक केल्यानंतर श्रीनगरमधील कारागृहात ठेवण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लोक म्हणतात यात काहीतरी गडबड आहे. परंतु कुठलेही पुरावे नाही, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी प्राण दिले. त्यांचे विचार आमची संपत्ती आहे. त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेत भविष्याचा भारत कसा तयार होईल, यावर भर देण्यात येत आहे. जे सर्व स्वतःला भारतीय मानतात, त्यांचा भारत आहे. काही लोक समाज तोडण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेसवर निशाणा, भाजपबाबत मुस्लिमामंध्ये विष पेरल्याचा आरोप
धर्मनिरपक्षेतेच्या नावावर काँग्रेसने मतपेटीसाठी तुष्टीकरणाचे धोरण अवलंबवले. आज देशातील जातीयवाद, सांप्रदायिकतेचे श्रेय काँग्रेसला जाते, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काँग्रेसने जनसंघ, त्यानंतर भाजपबाबत मुस्लिमामंध्ये विष पेरले, संविधानविरोधी, मुस्लीमविरोधी असल्याचा प्रचार केला, असा आरोप त्यांनी केला.
महाल येथील नक्षत्र सभागृहात ‘भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी’ यांच्यावर शनिवारी आयोजित व्याख्यानात गडकरी बोलत होते.गडकरी म्हणाले, जनसंघाचे काम सुरू असताना विचाराबाबत अनेक गैरसमज होते. आजही आमचा विचार राष्ट्र सर्वोपरी आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा राष्ट्रसमर्पित भाव त्यांचे वैशिष्ट्य होते. धर्मनिरपक्षेतेच्या नावावर काँग्रेसने मतपेटीसाठी तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले. आपण भारतीय आहोत, आपली संस्कृती, वारसा एक आहे. आपली पूजा पद्धती वेगळी आहे. आपल्याला संविधानाने धर्माबाबत स्वातंत्र दिले आहे. आम्ही अल्पसंख्याक किंवा कुठल्याही समाजाविरोधात नाही. मात्र, काँग्रेसने मुस्लिमांमध्ये जनसंघाविरोधात विष पेरले. गांधींचा खून केल्याचे सांगितले. भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या अपप्रचाराचा परिणामही झाला. गैरसमज दूर करण्याचे काम अनेक वर्षे करावे लागले, असे गडकरी म्हणाले.
केवळ मंदिरात जातात म्हणून हिंदू नव्हे !
जे होम हवन करतात, मंदिरात जातात ते हिंदू आहे, असे नाही. भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे. दोन्ही मिळून राष्ट्रीयत्व आहे. आमचे नाते राष्ट्रवाद व सांस्कृतिकवादाशी जुळलेले आहे. आम्ही राम मंदिर तयार केले, पण दिक्षाभूमी, ताजबागचा विकासही केला. आम्ही कधी भेदभाव केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जवाहरलाल नेहरूंच्या धोरणामुळे डॉ. मुखर्जी यांनी राजीनामा दिला
१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचे पहिले मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी याचा राष्ट्रसमर्पित भाव त्यांचे वैशिष्ट्य होते. परंतु कॉंग्रेस व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे धोरण अवलंबविले ते चुकीचे होते. लोकतंत्र, समाजवाद व धर्मनिरपेक्षता या तीन तत्वाचा स्वीकार करताना धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ कॉंग्रेसने चुकीचा प्रचलित केला.
धर्मनिरपेक्षतेला इंग्रजीत सेक्युलर म्हणतात. इंग्रजी शब्दकोषात सेक्युलरचा अर्थ सर्व धर्मसमभाव असा आहे. परंतु धर्मनिरपक्षेतेच्या नावावर कॉंग्रेसने मतपेटीसाठी तुष्टीकरणाचे धोरण अवलंबवले. सर्वांचा विकास व्हावा, ही राष्ट्रवादाची भावना घेऊन आम्ही काम करीत आहोत. हाच विचार श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिला. राष्ट्रवादानुसार आम्ही काम करीत आहे. परंतु कॉंग्रेसने या उलट धोरण स्वीकारले. जवाहरलाल नेहरू यांच्या काश्मीरच्या बाबत धोरणातून एकाच देशात दोन विधान, दोन झेंडे झाले. मग त्यांनी स्वायतत्ता व स्वातंत्र्याची गोष्ट करू लागले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या धोरणाचा विरोध करीत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे गडकरी म्हणाले.
काँग्रेसने ८० वेळा संविधानाची मोडतोड केली
संविधान कॉंग्रेसने ८० वेळा तोडले. मात्र आमच्यावर संविधानविरोधी असल्याचा अपप्रचार केला. कॉंग्रेसच्या अपचाराचा परिणामही झाला. गैरसमज दूर करण्याचे काम अनेक वर्षे करावे लागले. आम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नाही. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. जातीयता, सांप्रदायिकता वाईटच आहे. अनेक वर्षे लोकांतमध्ये गैरसमज होते. संघात सर्व स्वयंसेवक एकत्र बसतात, कधी जात विचारत नाही. पण लोक दुष्पप्रचार करतात. डॉ. मुखर्जी , दीनदयाल उपाध्याय, जनसंघाने शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवेचा मार्ग सांगितले. आम्ही जातीयवादी असतो तर लोकांनी आमच्यावर विश्वास नसता केला. संविधानातून ३७० कलम काढावे लागेल, असे डॉ. बाबासाहेबांनी संविधानात नमुद केले आहे. आमच्या सरकारने ते कलम रद्द केले. पुन्हा आमच्याविरोधात मुस्लिमविरोधात असल्याचा आरोप केला. आज काश्मीरमध्ये मोठा विकास झाला. तेथील लोकांमध्ये आमच्या सरकारने विकास केल्याचा विश्वास निर्माण झाला, असे गडकरी म्हणाले.
