नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घर केवळ वैभवशाली किंवा भव्य असल्यामुळे चर्चेत नाही, तर त्यामागील साधेपणा, आध्यात्मिक शांतता आणि विचारांची खोली यामुळे ते विशेष ठरते. गडकरी यांचे मूळ घर महाल येथे आहे. गडकरी वाडा या नावाने हे घर प्रसिद्ध होते. हे घर काही वर्षांनदी पाडून तेथे नवीन भव्य दिव्य असा नवीन गडकरी वाडा तयार झालेला आहे.
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. नवीन गडकरी वाडामध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने गृहप्रवेशाची पूजा केली. यासंदर्भातील व्हिडिओ डोळे दिपवणारा असा आहे.
या नवीन व्हिडिओमध्ये गडकरी संपूर्ण परिवारासोबत गृहप्रवेशाची पूजा करताना दिसतात. सोबतच त्यांच्या काही नातेवाईकही यावेळी उपस्थित आहेत. घराचा व्हिडिओ पाहिल्यावर सुरुवातीला त्याचे बांधकाम हे दक्षिण भारतातील पद्धतीनुसार असल्यासारखे दिसते. केरळामध्ये किंवा कोकणात असलेले घरे ज्याप्रमाणे बांधलेली असतात तसा घराचा समोरचा भाग दिसून येतो. या घराच्या विशेषते संदर्भात गडकरींनी अनेकदा आपल्या भाषणांमधून सांगितलेले आहे. हे संपूर्ण घर पर्यावरण पूरक असून उन्हाळ्यामध्ये थंड तर हिवाळ्यामध्ये आवश्यक अशी उष्णता देणारे आहे. गडकरींचे नवीन घर ज्या पद्धतीने बांधलेले आहे अशाप्रकारेचे पर्यावरण पूरक हे नागपुरातील पहिलेच घर असावे असेही गडकरींनी एकदा सांगितले.
गडकरींच्या घराचे प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊस काय आहे ?
गडकरींच्या नवीन घराला प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊस या पत्रकाराचा वापर केलेला आहे. प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊस ही आयजीबीसी किंवा लीडद्वारे प्रदान केलेली सर्वोच्च पर्यावरणीय प्रमाणन पातळी आहे, जी जागतिक स्तरावर टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, पाण्याचे संवर्धन आणि उच्च रहिवासी आरोग्य सुनिश्चित करते. हे घर ऊर्जेचा वापर कमी करते, पाणी वाचवते आणि निरोगी जीवनशैली प्रदान करते.
प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊसची मुख्य वैशिष्ट्ये:
ऊर्जा कार्यक्षमता: सौर ऊर्जा, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे आणि एलईडी लाइट्सचा वापर करून विजेची बचत करते. जल व्यवस्थापन: पावसाचे पाणी संकलन पाणी पुनर्वापर आणि कार्यक्षम नळांचा वापर करते. पर्यावरणपूरक साहित्य: बांधकाम करताना पुन्हा वापरता येण्याजोग्या किंवा नैसर्गिक साहित्याचा वापर करते.
गडकरी वाड्याचे महत्व काय ?
नितीन गडकरी यांचे बरेच आयुष्य महालेतील घरात गेलेले आहे. महाल येथील वाडा पाडण्यात आल्यानंतर गडकरींनी अनेक भाषणांमधून इतर भागात राहणं राहून मन रमत नसल्याचे सांगितले होते. महालच्या गडकरी वाड्याला मोठा राजकीय इतिहासही आहे. या वाड्यामध्ये अनेक राजकीय बैठका झाल्या असून महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे ती एक प्रकारची राजकीय ऐतिहासिक वास्तू होती. हे घर पाडल्यानंतर गडकरी शहराच्या इतर भागात राहत होते. मात्र त्यांचे मन रमत नसल्याचे त्यांनी अनेकदा सांगितलं. महालातल्या वाड्यात गेल्याशिवाय जमणार नाही असेही ते म्हणत होते. शेवटी गडकरींचा नवीन वाडा तयार झाला असून गृहप्रवेशाची पूजा झालेली आहे आता गडकरी नवीन घरात कधी जातात हे लवकरच कळेल.
