नागपूर : दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी | nitin Gadkari public displeasure with no cooperation from South West workers amy 95 | Loksatta

नागपूर : दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी

रामदासपेठ येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

नागपूर : दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी
रामदासपेठ येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

अपंग व व ज्येष्ठ नागरिकांना साधने वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी नी काम केले नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली तर दक्षिण नागपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा >>> शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्ती करणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मतदार संघातील अपंग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात आले त्यावेळी गडकरी बोलत होते. रामदासपेठ येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर देशमुख, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी विपीन इटनकर , शहर अध्यक्ष प्रवीण दटके आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, शहरातील सहा मतदार संघात ही योजना राबविण्यासाठी प्रशासनाने चांगले काम केले.

हेही वाचा >>> प्रेमाला भाषेचे बंधन नसते , वाचा मूकबधिर मैत्रीची प्रेमळ कथा

दक्षिण नागपुरात आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली तेथील नगरसेवकांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांना शंभरपैकी ९० टक्के गुण तर दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील मतदार संघातील कार्यकर्त्यानी कामच केले नसल्यामुळे त्यांना ५० टक्केपेक्षा कमी गुण दिले जाईल असे सांगत गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. खरे तर दोन मतदार संघ मिळून दहा हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेणे अपेक्षित होते पण ते दिसत नाही. त्यामुळे कोणी किती काम केले हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मनाला विचारा असा उपदेश करत कार्यकर्त्याचे कान टोचले. या कार्यक्रमाचा उद्देश हा राजकीय नाही. लोकांची सेवा केली तर त्यांच्यापुढे छायाचित्र घेऊन जाण्याची वेळ येणार नाही. लोकांच्या सेवेतून मत मिळवले पाहिजे असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे सुनावले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भंडारा : न्यायाधीशांच्या आसनाच्या दिशेने चप्पल भिरकावली ; आरोपीस अटक

संबंधित बातम्या

“अजित पवारांनी उंचीचा विचार करून बोलावं”; राज्यपालांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
सावधान..!‘भलत्याच’ संकेतस्थळांवर मुलींचे फोटो होतात अपलोड, ‘डीपी’वर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी
पीक विम्याची रक्कम तुटपुंजी; रविकांत तुपकरांनी गाठले कृषी अधीक्षक कार्यालय, अन् मग…
भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
किशोरावस्थेतील ७० टक्के मुले पोर्नोग्राफीच्या विळख्यात

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित