आपल्या देशात लोकशाही असल्याने साहित्यिकांनी निर्भिडपणे समाजस्वास्थाकरिता आणि राष्ट्रहिताकरिता आपले विचार प्रखरपणे मांडले पाहिजेत, असं मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमत ते बोत होते. यावेळी बोलताना साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेकरिता विदर्भ साहित्य संघ आणि स्थानिक प्रशासनाचे आभारही मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “बीआरएस सत्तेत आल्यास प्रत्येक दलित कुटुंबाला दरवर्षी १० लाख रुपये देणार”; नांदेडमध्ये केसीआर यांची मोठी घोषणा!

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

“आज या साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस अधिकारी यांचा सत्कार झाला, याचा मला आनंद आहे. या सारस्वताच्या महायज्ञात प्रशानसनाचं मोलाचं सरकार्य मिळालं ही राजकारण्याची साहित्याबाबतची भूमिका आहे. आपल्या देशात लोकशाही असल्याने साहित्यिकांनी निर्भिडपणे समाजस्वास्थाकरिता आणि राष्ट्रहिताकरिता आपले विचार प्रखरपणे मांडले पाहिजेत आणि हा त्यांचा अधिकार आहे, हे राजकारण्यांनी मान्य केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

“सहिष्णुता, प्रगल्भता ही आपल्या भारतीय संस्कृतिची विशेषत: आहे. मतभेत होऊ शकतात, पण मनभेत होता कामा नये. एकादा माणून आपल्या विचाराच्या विरुद्ध विचार मांडत असला, तरी त्याचे विचार ऐकूण घेतले पाहिजे. या देशाची लोकशाही पंरपरा राहिली पाहिजे. हीच भारतीय संस्कृतीची विशेषत: आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

पुढे बोलताना, “साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, याचं दुःख आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली. तसेच वर्ध्याच्या जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच हे संमेलन यशस्वी झालं असून वर्ध्यात हे संमेलन झालं, याचा खूप आनंद आहे. ही भूमी महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची भूमी आहे. याच भूमीत सिंधुताई सपकाळ, पांडुरंग खानखोजे यांच्यासारखे लोक घडले, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवारांनी थेट उत्तर देत विषय संपवला; म्हणाले “त्यांनी डोक्यातून…”

दरम्यान, “यंदाच्या साहित्य संमेलनात कोणताही वाद झाला नाही, याचा आनंद झाला. कारण विद्वान लोकं एकत्र आली की वाद होता. आमच्याकडे राजकारणात चार पाच लोकं निर्णय घेतात आणि बाकीचे केवळ हात वर करतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्थित चालते. राजकारण, समाजकारण, विकासकारण, राजनिती, लोकनिती आणि धर्मनिती याचे अर्थ वेगवेगळे आहेत”, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari speech in wardha akhil bhartiya sahitya sammelan spb
First published on: 05-02-2023 at 21:08 IST