लोकसत्ता टीम नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट वक्ते म्हणून ओळख आहे. त्यावरून त्यांना राजकीय किंमत देखील मोजावी लागली आहे. अनेकदा तर त्यांना आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचा खुलासा करावा लागला आहे. आता पुन्हा त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू आहे. नेमके काय म्हणाले गडकरी जाणून घेऊया. आणखी वाचा-संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध; वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमीपूजनचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस हजर होते. गडकरी म्हणाले, "माझे स्वप्न आहे, बोटीत बसून अंबाझरी तलाव ते पारडीपर्यंत नाग नदीतून जायचे. लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता. पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय राहत नाही.