यवतमाळ : स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचयातीपासून संसदेपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र देशाची गरीबी हटली नाही आणि विकासही झाला नाही. काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची गरीबी जरूर हटली. काँग्रेसने देशात फक्त जातीयवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष कालविण्याचे काम केले, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

उमरखेड येथे भाजप महायुतीचे उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते आज रविवारी बोलत होते. काँग्रेस देशात जाणीवपूर्वक भाजप संविधान बदलविणार असा संभ्रम निर्माण करत आहेत. पण घटनेची मुलभूत तत्व बदलता येत नाहीत, हे सत्य आहे. कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकत नाही. मात्र आणीबाणीमध्ये काँग्रेसनेच संविधानाची मोडतोड केली, अशी टीका नितीन गडकरी यांनी यावेळी केली. आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही, या शब्दांत त्यांनी संविधान बदलावरील चर्चेला सभेतून उत्तर दिले.

Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा – जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

काँग्रेस दर निवडणुकीला लोकांच्या मनात विष कालवते. अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही, ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रोजगार हमी आहे, अशी टीका गडकरी यांनी यावेळी बोलताना केली. पंतप्रधान ग्रामसडक योजना ही भाजपने सुरू केली. देशातील जवळपास साडेतीन लाख गावांना सर्वप्रथम पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी पक्क्या रस्त्यांनी जोडले. काँग्रेसने चुकीच्या क्षेत्रात सरकारी गुंतवणूक केली आणि गावांकडे दुर्लक्ष केले. गावातील शेतकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला नाही, असे गडकरी म्हणाले.

गरीबी, भुकमरी, बेरोजगारी ही आपली समस्या आहे. आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम नाही, कृषी पंप आहे पण वीज नाही, अशी स्थिती आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी व देशाच्या, राज्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपला सहकार्य करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. उमरखेड, यवतमाळ व राळेगाव मतदारसंघात गडकरी यांच्या सभांनी आज मैदान गाजविले.

हेही वाचा – ‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…

मी शरद जोशींच्या विचारांचा समर्थक

माणसाला जगण्यासाठी जेवढी ऑक्सीजनची गरज आहे, तेवढीच शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपने देशात कृषी सिंचाई योजना आणली. केंद्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्रात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आली आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांचा मी समर्थक होतो. जागतिकीकरणामुळे पिकांचे भाव ठरविण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. आपल्या पिकांचे भाव आपल्याला ठरवायचे असेल तर पीक पद्धतीत बदल केला पाहिजे, असे शरद जोशी म्हणायचे. पारंपरिक शेतीचा नाद सोडून शेतीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

Story img Loader