अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होऊ घातलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘लोगो’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- दिवाळीपूर्वी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन? लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता

वर्धा मार्गावरील गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विलास मानेकर, डॉ. रवींद्र शोभणे उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित केले जात आहे. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानात होणारे हे संमेलन गांधी-विनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे, त्यात तरुणाईचा सहभाग अधिकाधिक असावा आणि ते कायम स्मरणात राहील असे व्हावे, असे मत म्हैसाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा- अर्थमंत्रीच पालकमंत्री असल्याने नागपूरसाठी निधीची चिंताच नको; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

वर्धा शहराचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी बारा वर्षे वर्धेजवळील सेवाग्राम आश्रमात व्यतीत केली होती. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कळमकर यांनी वर्धा जिल्ह्याचा नकाशा, चरखा आणि लेखणीचा यांचा कलात्मक वापर करून हा ‘लोगो’ तयार केलेला आहे.

हेही वाचा- राज्यात ‘लम्पी’च्या एकूण बळींपैकी ४० टक्के विदर्भात; ४९ हजार पशुधन बाधित

नितीन गडकरी यांनी ‘लोगो’च्या कलात्मकतेचे कौतुक करतानाचा संमेलनाचे आयोजन भव्य होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विवेक अलोणी, प्रदीप दाते, प्रदीप मोहिते, मंजूषा जोशी, वर्धा शाखेचे संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते, महेश मोकलकर, आकाश दाते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari unveiled the logo of akhil bhartiya marathi sahitya sammelan nagpur news dpj
First published on: 07-10-2022 at 10:21 IST