scorecardresearch

Premium

नितीन गडकरींची स्वपक्षीय आमदारांवरच टोलेबाजी; म्हणाले, “आता फक्त हरीशचे शारीरिक वजन वाढण्याची चिंता…”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या मिश्कील स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मूर्तिजापूर येथे आयोजित महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमातील भाषणादरम्यान त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

Nitin Gadkaris trolling of own party MLA harish pimple
स्वपक्षीय आमदार हरीश पिंपळे यांच्या वजनावरूनच गडकरींनी गंमतीशीर टिप्पणी केल्याने सभेत हशा पिकला होता.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या मिश्कील स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मूर्तिजापूर येथे आयोजित महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमातील भाषणादरम्यान त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. स्वपक्षीय आमदार हरीश पिंपळे यांच्या वजनावरूनच गडकरींनी गंमतीशीर टिप्पणी केल्याने सभेत हशा पिकला होता.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
ravindra-dhangekar-12
आंदोलन करणाऱ्या मविआच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की; आमदार धंगेकर म्हणाले, “पुणे पोलिसांची…”
pune mahavikas aghadi marathi news, inauguration of water tank at gokhalenagar marathi news
पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण

आणखी वाचा-नितीन गडकरी म्हणतात, ‘चांगल्या रस्त्यांमुळेच विदर्भाचा विकास शक्य’

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणाचे लोकार्पण आणि मूर्तिजापूर-कारंजा मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना आमदार पिंपळेंनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांची बोलणी ऐकून वजन कमी झाल्याचा उल्लेख केला. तोच धागा पकडून गडकरी म्हणाले, ‘आता हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. त्यावर ५० वर्षे खड्डे पडणार नाहीत. रस्ता चांगला होईल. चिंता मात्र ही आहे की, पिंपळेंचे वजन वाढून १५० किलो व्हायला नको. नाहीतर चंद्र वाढतो कले कलेनी… हरीश वाढतो किलो किलोनी…’ अशा शब्दात गडकरींनी पिंपळेंच्या वजनावर मिश्कील टोला लगावला. गडकरींच्या गंमतीशीर वक्तव्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitin gadkaris trolling of own party mlas ppd 88 mrj

First published on: 23-11-2023 at 18:41 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×