नागपूर: अतिवृष्टी हा शब्दही कानावर पडल्यास नागपूरकरांना धडकी भरते. येथील अंबाझरी, डागा ले- आऊट, कार्पोरेशन काॅलनीसह अनेक भागात पाणी तुंबून बोटीद्वारे शेकडो नागरिकांना वाचवले गेले होते. यावेळी सिमेंट रस्त्याची उंचीसह नदी- नाल्यातील मलबा व अतिक्रमनाचाही प्रश्न पुढे आला होता. दरम्यान मुंबई, पुणे येथे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अ. भा. ग्राहक पंचायतने काही मागण्या केल्या आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे म्हणाले, पुणे, मुंबई व इतर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे वित्तहाणी झाली. विदर्भात, नागपूरात अतिवृष्टीमुळे असा जीवघेणा प्रसंग उदभवू नये यासाठी नदी, नाले, गटरची प्रशासनाने त्वरित साफसफाईची गरज आहे. नागपुरात काही वर्षांआधी पावसाळयापूर्वी अतिवृष्टीमुळे विदर्भात, नागपूरात व अन्य शहरांमध्ये नागरिकांच्या घरात, दुकानात, शाळा, कॉलेजमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड वित्तहाणी झाली होती.
शेतक-यांचे उभे पिके नष्ट होवून प्रचंड नुकसान झाले होते होते. दरम्यान विदर्भात, नागपूरात तसेच अन्य शहरांमध्ये सिमेंटचे रोड हे घरांपेक्षा दोन- दोन फुट उंच झाल्यामुळे रोडवर वाहणारे पाणी हे नागरिकांच्या घरात शिरुन नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. प्रत्येक वर्षी हा प्रकार घडत आहे. यावरही प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणीही पांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे, मुंबई सारखी विदर्भात, नागपूरात व इतर शहरांमध्ये परिस्थिती उदभवू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने, महानगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य गजानन पांडे, प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भटटलवार, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, ॲड. विलास भोसकर, उदय दिवे यांनी केली आहे. स्वच्छता न केल्यास आंदलनाचा इशारा संघटनेचे अनिरुध्द गुप्ते, संध्या पुनियानी, प्रकाश भुजाडे, प्रिती बैतुले, श्रीपाद हरदास, विनायक इंगळे, संध्या कुर्वे, अरविंद हाडे, ॲड अनिरुध्द दंडे, अजय काठोळे, राजु पुसदेकर, प्रसाद पोफळी, प्रशांत पाचपोहर, विजय पांडे, पंकज अग्रवाल, हेमंत जकाते, मंजीत देशमुख तसेच इतर पदाधिकारी यांनी दिला आहे.
संघटनेचे म्हणने काय?
नागपुरात अतिवृष्टी झाल्यास नदी, नाल्यांची तसेच गटारांची वेळोवेळी साफसफाई न झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे वित्तहाणी तर होतेच प्रसंगी जिवितहाणी सुध्दा होण्याची शक्यता आहे. शहरातील बऱ्याच ठिकाणी सिमेंट रोड, पुलांचे बांधकाम सुरु असल्यामुळे त्याचा मलबा नाल्यांमध्ये गेला आहे. त्यामुळे गटरलाईन, वेस्ट वाटर लाईन तुंबण्यासह फुटल्याही असल्याने त्याच्याही दुरूस्तीची मागणी अ. भा. ग्राहक पंचायतने केली आहे.