scorecardresearch

Premium

वाढीव मालमत्‍ता कराच्या नोटीस पेटवल्या, करवाढीच्या विरोधात अमरावतीत कॉंग्रेसचा मोर्चा

महापालिकेने मुल्‍यांकन करताना मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्‍याच्‍या निषेधार्थ कॉंग्रेसच्‍या वतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

Notices of increased property Amravati
वाढीव मालमत्‍ता कराच्या नोटीस पेटवल्या, करवाढीच्या विरोधात अमरावतीत कॉंग्रेसचा मोर्चा (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अमरावती : महापालिकेने मुल्‍यांकन करताना मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्‍याच्‍या निषेधार्थ कॉंग्रेसच्‍या वतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी संतप्‍त कार्यकर्त्‍यांनी वाढीव मालमत्‍ता कराच्‍या नोटीस पेटवून रोष व्‍यक्‍त केला. मालमत्‍ता करवाढीला तत्‍काळ स्‍थगिती द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्‍या शिष्‍टमंडळाने महापालिका आयुक्‍तांकडे केली.

मोर्चा महापालिकेवर पोहोचल्‍यानंतर महापालिका आयुक्‍त देवीदास पवार यांनी शिष्‍टमंडळासोबत चर्चा केली. शहर कॉंग्रेसचे अध्‍यक्ष बबलू शेखावत यांनी सांगितले की, शासन, प्रशासनाने लागू केलेली करवाढ चुकीची असून सर्वसामान्‍य जनतेला परवडणारी नाही. तत्‍कालीन आयुक्तांनी आवश्यकता नसताना केलेल्‍या खर्चाची भरपाई म्हणून आता ही अशा प्रकारची करवाढ करण्‍यात आली आहे. प्रशासनाने खर्च का केला? कशासाठी केला? याबाबतीतील कागदपत्रे जनतेपुढे जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारच्या करवाढीला आमचा विरोध आहे, असे बबलू शेखावत यांनी सांगितले.

Aslam shaikh death threat call
“मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढच्या दोन दिवसांत…”, मुंबईतील काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी
inmate escaping from Sassoon Hospital
पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार
Amrit Kalash Yatra
मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
panvel BJP leader Paresh Thakur request DCM Fadnavis relaxation arrears property tax
थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, “इतकी मस्ती…”

ही दरवाढ १८ वर्षानंतर एकदम केल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. अनेकांचा ५ ते ७ पट कर वाढलेला आहे, या वाढीचा आम्ही विरोध करतो आणि शासन व प्रशासन दोघेही संगनमत करून अमरावती शहरातील जनतेचा छळ करत आहे व लूट करत आहे, असा आरोप माजी महापौर विलास इंगोले यांनी केला.

हेही वाचा – “फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

आयुक्तांनी आमच्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे आणि आम्ही केलेली करवाढ, हे सर्व तपासून पाहण्यासाठी ४ दिवसांची मुदत मागितली. त्या ४ दिवसांच्या मुदतीनंतर करवाढी संबंधित तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून काँग्रेस पक्षाला लेखी स्वरुपात कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notices of increased property tax burnt congress march in amravati against tax hike mma 73 ssb

First published on: 25-09-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×