भंडारा : कामानिमित्त गोबरवाहीकडे जाणाऱ्या मोक्का प्रकरणातील एका सराईत आरोपीची काही अज्ञात आरोपींनी बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केल्याची थरारक घटना आज, सोमवारी सायंकाळच्या सुमारास गोबरवाई रेल्वे फाटकजवळ घडली. नईम खान, असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर मुख्य आरोपी आरोपी फरार असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा >>> लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार, एक गंभीर




गोबरवाही रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे सर्व वाहने तिथे थांबली होती. नईम खान त्याच्या चारचाकी वाहनात बसला होता. दरम्यान मागेहून दुचाकीने आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. यात नईम खान याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वाहनातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी घटनास्थळ गाठले. सध्या तीन संशयित आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.