scorecardresearch

आता फक्त सोमवारी व गुरुवारी होणार प्रशासनाच्या दृक् श्राव्य बैठका

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव वगळता अन्य अधिकारी वर्गासाठी या दोन दिवसांचा दंडक घालण्यात आला आहे.

आता फक्त सोमवारी व गुरुवारी होणार प्रशासनाच्या दृक् श्राव्य बैठका
(संग्रहीत छायाचित्र)

वर्धा : प्रशासनाच्या दृक् श्राव्य बैठका आता फक्त सोमवार व गुरुवार या दोनच दिवशी आयोजित करण्याची सूचना महसूल विभागाने केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव वगळता अन्य अधिकारी वर्गासाठी या दोन दिवसांचा दंडक घालण्यात आला आहे. मंत्रालयीन विभागातर्फे आयोजित या बैठकीला विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निमंत्रित करण्यात येते.

हेही वाचा : चंद्रपूर : पूरग्रस्त भागात घराचे बांधकाम, प्लॉट खरेदीची जबाबदारी नागरिकांची

मात्र त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय स्तरावरील बैठका व दृक् श्राव्य संवाद तसेच क्षेत्रीय पातळीवरील दैनंदिन कामकाज यात सुसूत्रता व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून गुरुवार व सोमवार या दोनच दिवशी बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now audio visual meetings of the administration will be held only on mondays and thursdays in vardha tmb 01

ताज्या बातम्या