scorecardresearch

Premium

आता रेल्‍वे स्‍थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३ हजार ६५२ कॅमेऱ्यांची नजर

या सुरक्षा प्रकल्पासाठी निर्भया निधी वापरण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ३६४ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३,६५२ कॅमेऱ्यासह ६,१२२ सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

face recognition cameras railway stations
आता रेल्‍वे स्‍थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३ हजार ६५२ कॅमेऱ्यांची नजर (image credit – representational image/loksatta graphics/pixabay)

अमरावती : मध्‍य रेल्‍वेने प्रवाशांच्‍या सुरक्षेसाठी रेल्‍वे स्‍थानकांवर अत्‍याधुनिक दर्जाचे ३ हजार ६५२ कॅमेरे (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स व्हिडीओ सर्व्हिलन्‍स) बसविण्‍याचा निर्णय घेतला असून भुसावळ विभागातील सर्वच मेल, एक्‍स्‍प्रेसचे थांबे असलेल्‍या ७० रेल्‍वे स्‍थानकांवर ही व्‍यवस्‍था उपलब्‍ध करून दिली जाणार आहे.

या सुरक्षा प्रकल्पासाठी निर्भया निधी वापरण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ३६४ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३,६५२ कॅमेऱ्यासह ६,१२२ सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ‘रेलटेल’च्या माध्यमाने मोफत वायफाय स्थानकात उपलब्ध आहे. ऑप्टिकल फायबरच्या माध्यमाने सीसीटीव्हीची जोडणी स्थानिक रेल्वे सुरक्षा कक्ष, विभागीय कक्ष आणि केंद्रीय कक्ष अशा ठिकाणी देण्यात येणार आहे. त्रिस्तरीय सुरक्षेमुळे रेल्वे स्थानकांसह प्रवाशांची सुरक्षा वाढणार आहे.

train ticket nagpur
नागपूर : रेल्वेचे करंट तिकीट कुठून घ्यायचे?
grain rice scam
धान्य घोटाळा : निकृष्ट तांदूळ पुरवठा करणाऱ्या सहा गिरण्या काळ्या यादीत, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..
peeding up construction of Hadapsar Railway Terminal
पुणे रेल्वे स्थानकाला लवकरच पर्याय! हडपसर रेल्वे टर्मिनल उभारणीला गती
central railways collect fine rs 16 88 crore in one month from ticketless travellers
अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

हेही वाचा – पाऊसमान : पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा, पुढील ७२ तासांत…

हेही वाचा – वर्धा : आता गावागावात भाजपा नेत्यांसाठी पत्रकारांतर्फे चहापान व एकदा जेवण

प्‍लॅटफॉर्मसाठी बुलेट प्रकार, इनडोअर भागांसाठी डोम प्रकार, संवेदनशील ठिकाणांसाठी ‘अल्‍ट्रा एचडी ४ के कॅमेरे आणि पार्किंग क्षेत्रासाठी पॅन-टिल्‍ट-झूम यामधून थेट प्रसारण रेल्‍वे सुरक्षा बलाच्‍या नियंत्रण कक्षातील स्‍क्रीनवर दाखवले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा मुख्य उद्देश हा रेल्वे स्थानकातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे हा आहे. गर्दीत चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यास मदत होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now the eyes of 3 thousand 652 face recognition cameras at railway stations mma 73 ssb

First published on: 27-09-2023 at 12:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×