सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ३१

जिल्ह्य़ात २४ तासांत ४ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली.

२४ तासांत ४ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ४ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. सलग दोन दिवस करोनामुक्तांहून नवीन रुग्ण अधिक आढळल्याने सक्रिय रुग्णसंख्या ३१ रुग्णांवर पोहोचली.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील २६, ग्रामीणचे ५ अशा एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे.  दिवसभरात शहरात ३, ग्रामीणला १ असे एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ४०३, ग्रामीण १ लाख ४६ हजार २०२, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८९० अशी एकूण ४ लाख ९३ हजार ४९५ रुग्ण नोंदवली गेली. दरम्यान, बुधवारी जिल्ह्य़ात ११ रुग्ण आढळले असतांनाच दुसऱ्या दिवशी केवळ ४ रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्य़ात दिवसभरात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५,८९३, ग्रामीण २,६०४, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२४ अशी एकूण १०,१२१ रुग्ण इतकी आहे.  शहरात दिवसभऱ्यात ३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ४८४, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५९३, जिल्ह्य़ाबाहेरील ५,२६७ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ३४४ इतकी आहे.

३,१२६ चाचण्या शहरात दिवसभरात २,४५७, ग्रामीणला ६६९ अशा एकूण  ३,१२६ चाचण्या झाल्या. ही संख्या बुधवारी जिल्ह्य़ात थोडी जास्त म्हणजे ३,४९२ इतकी होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Number active corona victims ysh

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या