नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी ; अकोला, अमरावती, नागपुरात गुन्हयांची नोंद

भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर मजकूर टाकला होता.

nupur sharma
नुपूर शर्मा (संग्रहीत छायाचित्र)

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर मजकूर टाकला होता. असा मजकूर टाकणाऱ्यांना विशिष्ट समुदायाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे विदर्भातील अनेकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर मोहीम चालवली गेली. अनेकांनी फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून नुपूर शर्मांन प्रोत्साहन देणारे संदेश अग्रेषित केले. त्यामुळे विशिष्ट समुदायांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर अमरावतीतील औषधविक्रेता उमेश कोल्हे यांचा काहींनी कट रचून खून केला. तिकडे अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. अमरातीमध्येसुद्धा काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नागपुरात नंदनवन आणि लकडगंज पोलीस ठाण्यातही धमकी देणाऱ्या काही युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नंदनवनमध्ये तर एका युवकाचे अख्खे कुटुंब दहशतीत जगत असून तो युवक अजूनही नागपुरात परत येण्याचे धाडस करीत नसल्याची माहिती आहे. लकडगंजमध्येही एका युवकाने नुपूर यांच्या समर्थनार्थ मजकूर टाकल्यानंतर त्याला काही युवकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती.

समर्थकांवरही गुन्हे
नुपूर शर्मा समर्थक असलेल्या कामठीतील एका तरुणीने आणि तरुणाने ट्वीटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कामठीत तणाव निर्माण झाला. नागरिकांनी कामठीच्या दोन्ही पोलीस ठाण्याला घेराव घालत तरुण व तरुणीला अटकेची मागणी केली. शेवटी कामठी पोलीस ठाण्यात एका तरुणीसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nupur sharma supporters threatened to kill crime recorded in akola amravati nagpur amy

Next Story
‘डॉ.पंदेकृवि’ नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करणार ; राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली उद्या ३६ वा दीक्षांत सोहळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी