गोंदिया: वर्षानुवर्षांपासून ओबीसी वसतिगृहाची मागणी केली जात होती,ते वसतिगृह तर सुरु झाले.मात्र त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा निर्वाह व भोजन भत्ता न मिळाल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये  महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या  ८३४ जागा कमी झाल्या. ओबीसीं विद्यार्थी, विद्यार्थींनीना लागू करण्यात आलेल्या आधार योजनेचा निधी अद्याप न दिल्याने संकट ओढवले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी अधिकार मंच संघटनेसह जिल्ह्यातील सर्व ओबीसी बहुजन संघटनाच्यावतीने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे  देण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ओबीसी बहुजन कल्याण मंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,कैलास भेलावे,ओबीसी सेवा संघाचे राज्य संघटक सावन कटरे,नरेश परिहार,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे आदी उपस्थित होते.

Story img Loader