गडचिरोली : भाजप महायुती विरोधात देशपातळीवरील तयार झालेल्या इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्याना आता महाविकास आघाडी – इंडिया आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. गडचिरोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा – जराते या महाविकास आघाडी – इंडिया आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची अडचण झाली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे यांनी पक्षाच्यावतीने राज्यातील सर्व उमेदवारांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यात शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जे अधिकृत उमेदवार दिले आहेत ते इंडिया आघाडी व महाविकास आघाडी पुरस्कृत आहेत, असे नमूद आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्ष निवडणुकीत प्रचार करणार आहे. अशी माहिती माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी दिली. येथून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मनोहर पोरेटी मैदानात उतरले आहे. परंतु शेकापने देखील दावा केल्याने निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसू शकतो. लोकसभेतही शेकापने काँग्रेस विरोधात भूमिका घेतली होती. यासंदर्भात काँग्रेसने अद्याप भूमिका जाहीर केलेली नसल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…

जयश्री वेळदा- जराते यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे

शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा- जराते यांच्यावर वेगवेगळे आंदोलन केल्याबद्दल ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलेली आहे.जयश्री वेळदा यांचेवर एटापल्ली पोलीस स्टेशन येथे भांदवी ३६५, भांदवी १८८, १४३, २७९ म.पो.का. ३७(१), (३), १३५ असे दोन तर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवी १८८ म.पो.का.१३५ असा एक गुन्हा दाखल असून अहेरी व गडचिरोली न्यायालयात सदर प्रकरणे प्रलंबित आहेत. गडचिरोली विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करतांना गुन्हे दाखल असलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. जल, जंगल, जमीन आणि खदानविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांपेकी एक असलेल्या जयश्री वेळदा यांनी रामदास जराते यांच्या सह २०१७ मध्ये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविलेले आहेत, हे विशेष.

Story img Loader