बुलढाणा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दीर्घ काळ चाललेल्या मतमोजणीदरम्यान भाजपने अवैध ठरलेल्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली. त्यावेळी मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांवर दवाब असल्याचे सांगून कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीचे टेबल सोडून जाऊ नका असा आदेश दिला. त्याचे पालन करून मी ही फेरमोजणी दहाच टेबलवर करण्याची मागणी केली आणि नंतर सर्वच सुरळीत पार पडले, असा खळबळजनक गौप्यस्फोट नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी येथे केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वर्धा : नरेंद्र चपळगावकर विद्रोहीच्या मांडवात! सौहार्दाच्या एका नव्या परंपरेची सुरुवात

आज, शनिवारी बुलढाणा शहरात आगमन झाल्यावर लिंगाडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या सत्कार सोहळ्याच्या समारोपात मनोगत व्यक्त करताना आ. लिंगाडे यांनी हा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली. स्थानिक गांधी भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोन्द्रे होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर जिल्ह्यातील आघाडीचे नेते, पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते. यावेळी लिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials under pressure illegal recount of graduation elections dheeraj lingade scm 61 ysh
First published on: 04-02-2023 at 20:05 IST