scorecardresearch

बुलढाणा : …अन् वृद्ध कलावंत उतरले पैनगंगेच्या नदीपात्रात

यादीमध्ये खऱ्याखुऱ्या कलावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप वृद्ध कलावंतांनी केला

बुलढाणा : …अन् वृद्ध कलावंत उतरले पैनगंगेच्या नदीपात्रात
मनमानी पद्धतीने करण्यात आलेल्या वृद्ध कलावंत निवड यादीच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त वृद्ध कलावंतांनी आज पैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले फोटो सौजन्य : लोकसत्ता

मनमानी पद्धतीने करण्यात आलेल्या वृद्ध कलावंत निवड यादीच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त वृद्ध कलावंतांनी आज पैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. यामुळे नदीकिनारी दाखल झालेल्या समाज कल्याण विभागाच्या पथकाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये कॉंग्रेसचा घोळ काही संपेना, देशमुख यांचा शिक्षक भारतीला पाठिंबा

राज्यातील वृद्ध कलावंतांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मानधन दिले जाते. याची निवड वृद्ध कलावंत मानधन समिती आणि समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र, या यादीमध्ये खऱ्याखुऱ्या कलावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप वृद्ध कलावंतांनी केला. यादीमध्ये वृद्ध कलावंतांना समाविष्ट करून मानधन देण्यात यावे आणि या निवड यादीमध्ये घोळ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती कळताच समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा >>> पदवीधर मतदारसंघात पदवीधरांचे प्रश्न बेदखल

…तर प्रतीकात्मक प्रेतयात्रा यावेळी युवा स्वाभिमानीचे नेते ईश्वरसिंह चंदेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शासन निर्णयानुसार ३०० कलावंतांची निवड करणे बंधनकारक असताना अधिकाऱ्यांनी २६३ जणांचीच यादी केली. तसेच खऱ्या कलावंतांना डावलले. यामुळे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर १ फेब्रुवारीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची बुलढाणा शहरात प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी कलावंतांच्या वतीने दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 16:59 IST

संबंधित बातम्या