scorecardresearch

महिला, मध्यरात्र, आणि उकळता चहा..! नागपुरात एक प्रयोग असाही

सहयोग ट्रस्ट आणि स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने ‘नाईट टी विथ आझादी’ हा आगळावेगळा उपक्रम नुकताच शंकरनगर चौकात राबवला. यावेळी महिलांनी रात्री बारा वाजता एकत्र येत टपरीवर चहा-कॉफीचा आनंद घेतला व चर्चा केली.

Night Tea with Azadi Nagpur
महिला, मध्यरात्र, आणि उकळता चहा..! नागपुरात एक प्रयोग असाही (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : स्त्रीच्या मनातील घुसमट, तणाव दूर करण्यासाठी आणि रात्री घराबाहेर पडण्याच्या भीतीतून मुक्त करण्यासाठी सहयोग ट्रस्ट आणि स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने ‘नाईट टी विथ आझादी’ हा आगळावेगळा उपक्रम नुकताच शंकरनगर चौकात राबवला. यावेळी महिलांनी रात्री बारा वाजता एकत्र येत टपरीवर चहा-कॉफीचा आनंद घेतला व चर्चा केली.

या कार्यक्रमाच्या संयोजिका या ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी, तसेच स्वराज फाउंडेशनचे संदेश सिंगलकर हे होते. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात महिलांना आजही पुरुषी दबावाखाली जगावे लागते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या महिलांना मनासारखे जगता येत नाही. समाजात महिलांनाही भयमुक्त जीवन जगता यावे. तिला संरक्षण, समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, उशिरा रात्री रस्त्याने जाणाऱ्या महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलावी, याच सहभागी महिलांच्या भावना होत्या.

हेही वाचा – गौरवास्पद ! शेतकऱ्याची मुलगी वाशीम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर, ‘इंडियन नेव्ही’मध्ये निवड

हेही वाचा – नागपूर : आई कर्करोगाने गेली, बाबा-भाऊ परगावी गेले, अन तरुणीने..

या उपक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सदस्य आभा पांडे, पूनम गोपलानी, एकता खंडर, लीना अमेसर, नीता अंजनकर, वैदेही चवरे, रश्मी मुरारकर, नीरजा प्रसाद, अर्चना व्यंकटरमण, जुईली भुसारी, तसेच अनेक गृहिणी, अधिकारी व कर्मचारी महिला व जरीपटका, म्हाळगी नगर, राजनगर, नंदनवन इ. विविध भागांमधून आलेल्या ८० महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या