चंद्रपूर: वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रूपये खर्च करून ‘कर्करोग निदान’ करणारी रूग्णवाहिका आणण्यात येणार आहे. १५ जून ला रूग्णवाहिकेचे लोकार्पण होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग चंद्रपूरात राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान असलेली अद्ययावत ‘कर्करोग निदान’ करणारी रूग्णवाहिका आणण्यात येणार आहे. या रूग्णवाहिकेत नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जर त्याला कर्करोगाचा धोका असेल तर त्याचे वेळीच निदान होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. ही बाब, माजी मंत्री विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात येताच त्यांनी यावर प्रतिबंध घालण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी वेळेपूर्वीच कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळताच त्यांनी लगेच ती रूग्णवाहिका तयार करण्याचे निर्देश दिले. या गाडीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे कॅन्सर होण्याची लक्षणे असतील तर त्याचे वेळीच निदान होणार आहे. यासोबतच कॅन्सर झाला असेल तर तो कोणत्या स्टेजला आहे हेसुद्धा कळणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच उपचार घेता येणार असून जीव वाचण्यास मदत होणार आहे. १५ जून रोजी रूग्णवाहिका ब्रह्मपुरीत दाखल होणार आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी अमेरिकन संस्थेशी करार केला असून त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची चमू त्या रुग्णांवर उपचार करणार आहे. लवकरच त्या गाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कर्करोगामुळे एकाही नागरिकांचा मृत्यू होवू नये यासाठी हे अद्ययावत तंत्रज्ञान प्रथमच चंद्रपूरात आणण्यात येत असून या रूग्णवाहिकेचा गोर-गरीब जनतेला लाभ होणार आहे.

hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
Krishi Integrated Command and Control Centre
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; बळीराजाला कसा फायदा होणार?

हेही वाचा >>>“आमच्या वाटेला जाल, तर सोडणार नाही!” आमदार नितेश राणे यांचा इशारा, म्हणाले…

४० प्रकारच्या रक्त तपासण्या होणार

त्या अद्ययावत गाडीमध्ये एक डॉक्टर, एक नर्स, एक टेक्निशियन, असिस्टंट, हेल्पर यांची चमू राहणार आहे. ती गाडी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. या गाडीमध्ये ४० प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लड टेस्टही करण्यात येणार आहेत. रूग्णवाहिकेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ओरल कॅन्सरची स्क्रिनिंग, बेस्ट कॅन्सरची स्क्रिनिंग, कॅन्सर डिटेक्ट होणार आहे. याचा अनेकांना फायदा होणार आहे.

हेही वाचा >>>राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा विस्तार होणार; अकोल्यातील पदवी महाविद्यालय चालू सत्रापासूनच; १६४ पदांसह…

तज्ज्ञ चमू करणार उपचार

गाडीमध्ये आरोग्य तपासणी केल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी केली जाईल. अमेरिकेतील एका संस्थेशी करार करण्यात आला असून त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू त्या रुग्णांवर उपचार करणार आहे.