नागपूर : २८० किलो तांदूळ, २०० किलो मूग डाळ, ५० किलो तेल, कोबी १५० किलो, ५० किलो तूप, ३५ किलो मीठ, कांदे ५० किलो ७५ किलो गाजर, तीन हजार लिटर पाणी, मटर, काजू, कोथिंबीर आदी साहित्य एकत्र करून तीन तासात दोन हजार किलोची स्वादिष्ट खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी सकाळी मकरसंक्रमणानिमित्त बजेरियातील वंदेमातरम उद्यानात केली. हजारो लोकांनी या खिचडीचा आस्वाद घेत उपक्रमाला दाद दिली.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना

when bjp leader ashish shelar accidently said Sunetra Pawars defeat in Baramati know what happen exactly
Video: …अन् आशिष शेलार म्हणाले, “सुनेत्रा पवारांचा पराभव होणार!”
Modi, Sharad Pawar, pune,
मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार

लोटस कल्चरल ॲन्ड स्पोर्टिंग असोसिएशनच्यावतीने बजेरियातील वंदेमातरम उद्यानात माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम करण्यात आला. सकाळी ९ वाजता खिचडी तयार करण्यास सुरूवात केल्यानंतर विष्णू जी रसोई येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करत संक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम केला. विष्णू मनोहर यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी अन् खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी खाद्यप्रेमींनी गर्दी केली.