scorecardresearch

नागपूर: जरीपटक्यात महिला- पुरूषामध्ये ‘फ्री स्टाईल’ वादाचे कारण काय?

उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा चौकापासून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास एक कारचालक पुरूष आणि दुचाकी चालक महिलेत जोरदार ‘फ्री स्टाईल’ झाली.

fight broke out between a male car driver and a female two-wheeler driver
जरीपटक्यात महिला- पुरूषामध्ये ‘फ्री स्टाईल’ वादाचे कारण काय?

उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा चौकापासून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास एक कारचालक पुरूष आणि दुचाकी चालक महिलेत जोरदार ‘फ्री स्टाईल’ झाली. हे चलचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले .

हेही वाचा >>>बुलढाणा: ‘देवेंद्र अंकल ऐकाना… माझ्या पप्पांना जुनी पेंशन द्याना’; संपकऱ्यांच्या वाहन रॅलीतील बालकाने वेधले लक्ष

जरिपटक्यात महिलेची दुचाकी अचानक कार समोर आली. त्यावर कार चालक शिवशंकर श्रीवास्तव यांनी महिलेला शिवीगाळ केली. महिलेनेही दुचाकीवरून उतरून प्रथम कार थांबवत चालकाशी वाद घातला. त्यांचे रूपांतर शाब्दिक वाद व हाणामारीत झाले. काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. तो थोड्याच वेळात समाज माध्यमांवर वायरल झाला. या प्रकरणात पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून कारचालकाला ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 22:10 IST
ताज्या बातम्या