उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान | one and half thousand hens in Deoli taluka wardha district died due to heat stroke | Loksatta

उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली.

poultry farm
कुक्कुटपालन (सांकेतिक फोटो)

वर्धा : देवळी तालुक्यातील बाबापूर शिवारातील एका पोल्ट्री फार्ममधील दीड हजारपेक्षा जास्त कोंबड्या उष्माघाताने ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर पचगडे नावाच्या शेतकऱ्याने हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला होता. मात्र एकाच दिवसात त्याला पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा >>> धक्कादायक! प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या

सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झालेली आहे. वर्धा जिल्ह्याचे तापमानही सध्या चांगलेच वाढत आहे. याच वाढत्या उन्हाचा फटका पचगडे यांना बसलाय. उन्हामुळे त्यांच्या दीड हजार कोंबड्या एकाच दिवसात मरण पावल्या असून त्यांचे तब्बल पाच लख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>> विधानपरिषद उमेदवारीवरुन पंकजा मुंडे यांचे मोठे विधान, म्हणाल्या, “लवकरच…”

पचगडे यांचा सात हजार पक्ष्यांचा फार्म आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी पुरेसे हिरवे आच्छादन टाकलेले होते. तसेच वाढत्या तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम होऊ नये म्हणून स्प्रिंकलरने पाणी शिंपडले जात होते. मात्र एक जूनला भारनियमन करण्यात आल्याने ते बंद पडले. त्यातच जनरेटरमधील डिझेल संपल्याने पर्याय उरला नव्हता. याच कारणामुळे दोन जून पासून कोंबड्यानी मान खाली टाकायला सुरवात केली.

हेही वाचा >>> “अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

रात्रीतच एक हजारावर कोंबड्या ठार झाल्या. आज सकाळपर्यंत सोळाशे कोंबड्या मृत झाल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी सांगितले. मृत कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे. यावेळी वीज खंडित करण्यात आल्याने हा अनर्थ झाल्याचे पचगडे यांनी आरोप केला आहे. तसेच त्यांनी नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2022 at 12:27 IST
Next Story
“सरसंघचालकांनी मांडलेली भूमिका लोकांना जोडणारी,” विजय वडेट्टीवारांकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत