scorecardresearch

Premium

VIDEO: दहीहंडी उत्सवाला गालबोट! गॅलरी कोसळून मुलीचा मृत्यू, एक गंभीर

नेमके गॅलरीच्या खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (९) हिचा जागीच मृत्यू झाला. य अल्फिया शेख हाफिज ही (८वर्षे ) गंभीर जखमी झाली आहे.

one girl died one girl injured gallery house tied dahihandi rope, collapsed Deulgaon Raja buldhana
VIDEO: दहीहंडी उत्सवाला गालबोट! गॅलरी कोसळून मुलीचा मृत्यू, एक गंभीर (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवाला देऊळगाव राजा येथील दुर्घटनेने गालबोट लागलं आहे. दहीहंडीचा दोरखंड बांधलेली घराची गॅलरी दोन बालिकांवर कोसळल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला तर एक बालिका गंभीर जखमी झाली.

दहीहंडी पाहत उभी असलेली चिमुकली जागीच ठार झाली. चिमुकलीचे वय केवळ ९ वर्षाचे आहे. देऊळगावराजा शहरातील मानसिंगपुरा भागात काल रात्री उशिरा ही घटना घडली. दहीहंडी साठी एका बंद अवस्थेत असलेल्या घराच्या गॅलरीला दोरी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा या दोरीला लटकला. त्यामुळे ताण पडल्याने सिमेंट पिलरसह गॅलरी खाली कोसळली. नेमके गॅलरीच्या खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (९) हिचा जागीच मृत्यू झाला. य अल्फिया शेख हाफिज ही (८वर्षे ) गंभीर जखमी झाली आहे.तिच्यावर उपचार सुरू आहेत.

farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
signpost in Navi Mumbai was removed after Flamingos death
फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर नवी मुंबईतील दिशादर्शक फलक हटविला
Youth killed on suspicion of being a thief in Bhayander
भाईंदर: इमारतीच्या गच्चीवरून पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
Video: 25-Year-Old Agra Man Dies Of Heart Attack While Working In Sweet Shop
मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

हेही वाचा… सारस पक्ष्यांचे होणार सॅटेलाईट टॅगिंग, वनमंत्र्यांचे ट्वीट; वाचा सविस्तर…

दरम्यान, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतक व जखमींना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One girl died and one girl injured when the gallery of the house which was tied with dahihandi rope collapsed in deulgaon raja buldhana scm 61 dvr

First published on: 08-09-2023 at 12:58 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×