scorecardresearch

‘महिलांच्या भागीदारीतून विज्ञान विकास व्हावा’; १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्धाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान

मोदी म्हणाले, पुढील २५ वर्षाच्या भारताच्या यशाच्या वैज्ञानिक शक्तीचे मोठे योगदान असणार आहे. विज्ञानात पॅशनसोबत देश प्रेम, एकविसाव्या शतकात भारतीय वैज्ञानिक समूह भारताला पुर्णनिरीक्षण हा विज्ञानाचा आधार राहीला आहे.

‘महिलांच्या भागीदारीतून विज्ञान विकास व्हावा’; १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्धाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान
नागपूरमधील १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेस प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्धाटन

भारत आधुनिक विज्ञानाची ऍडव्हान्स प्रयोगशाळा बनावा. महिलांच्या भागीदारीतून विज्ञानाचा आणखी विकास व्हावा . तरुणांना व्यासपीठ प्रदान करणारे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क तयार व्हावे असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. १०८ व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या ( इंडियन सायन्स काँग्रेस ) उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

हेही वाचा- ‘टेमघर’ पुन्हा रिकामे, दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

नरेंद्र मोदी म्हणाले, पुढील २५ वर्षाच्या भारताच्या यशाच्या वैज्ञानिक शक्तीचे मोठे योगदान असणार आहे. विज्ञानात पॅशनसोबत देश प्रेम, एकविसाव्या शतकात भारतीय वैज्ञानिक समूह भारताला पुर्णनिरीक्षण हा विज्ञानाचा आधार राहीला आहे. एकविसाव्या शतकातील भारतात डेटा आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यामुळे भारतीय वैज्ञानाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवील. डेटा अनॅलिसीस, पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. आजचा भाराताचा वैज्ञानिक दृष्टीकोण घेऊन पुढे जात आहे. २०१५ पर्यंत १३० देशाच्या ग्लोबल इनोव्हेशन क्रमांक ८२, २०२२ मध्ये ४०, स्टार्टअप परिस्स्थांज्या बाबतीत जगातील टॉप ३ देशांत आहे. विश्वाचे भविष्य शाश्वत विकासासोबतच सुरक्षित आहे.

हेही वाचा- नववर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री ‘त्याने’ भावाच्या मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी केली; तिने नकार देताच…

शाश्वत विकासाला महिला सक्षमिकरणाशी जोडला आहे. व्यवहारिक स्तरावरही हे एक दूसऱ्याला जोडले आहे. केवळ विज्ञानातून महिला सक्षमिकरण नाही तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमिकरण करूयात. जीट्वेंटी, महिलांची भागिदारी वाढत चालली असून, समाज आणि विज्ञान पुढे जात आहे. आपल्या ज्ञानाला अप्लिकेशनमध्ये बदलुन ज्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य होईल असे तंत्रज्ञान विकसित करा. यावेळी संशोधकांचे संशोधन प्रयोशाळेबाहेर निघून जमिनीच्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 12:54 IST

संबंधित बातम्या