scorecardresearch

Premium

‘एम्स’मध्ये आता ‘ओपन हार्ट सर्जरी’; पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार

उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आता ‘ओपन हार्ट सर्जरी’ची सोयही उपलब्ध झाली आहे. २७ सप्टेंबरला येथे पहिली यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून आता हा रुग्ण झपाट्याने बरा होत आहे.

AAIMS hospital

नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आता ‘ओपन हार्ट सर्जरी’ची सोयही उपलब्ध झाली आहे. २७ सप्टेंबरला येथे पहिली यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून आता हा रुग्ण झपाट्याने बरा होत आहे. लवकरच त्याला सुट्टीही होणार आहे. एम्समध्ये यापूर्वी ‘ॲन्जोप्लास्टी’ करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. परंतु, आता येथे ‘सीव्हीटीएस’ विभागही कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे आता येथे लवकरच मोठ्या प्रमाणावर ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियाही उपलब्ध होणार आहे.

याआधी येथून ‘ओपन हार्ट सर्जरी’ची गरज असलेले रुग्ण मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पाठवले जात होते. परंतु, आता येथेच ही शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. येथे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला ‘ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट’ नावाचा आजार होता. या रुग्णाला ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून हृदयातील छिद्र बंद केले गेले. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता अतिदक्षता विभागातून बाहेर आला आहे. त्याला रुग्णालयातून सुट्टीही मिळणार असल्याचे एम्सकडून स्पष्ट करण्यात आले.

Pepper Advantage, london, mukund kulkarni, credit business, india
‘पेपर ॲडव्हान्टेज’च्या राज्यातील पत-व्यवसायात दुपटीने वाढ; कृत्रिम प्रज्ञेवर आधारित सेवांचा विस्तार
weekly tech updates iphone 15 series whatsapp and layoff
Weekly Tech Updates: iphone 15 सिरीजचे लॉन्चिंग ते गुगलच्या कर्मचारी कपातीपर्यंत; पाहा टेक क्षेत्रातील ‘या’ घडामोडी
Bajaj Housing Finance
बजाज हाऊसिंग फायनान्स देत आहे फेस्टिव्ह होम लोन्स; व्याजदर दरवर्षी ८.४५ टक्क्यांपासून सुरू
nifty
तेजीवाल्यांचा जोर कायम, निफ्टीचा पहिल्यांदाच विक्रमी २० हजारांपुढे बंद स्तर

हेही वाचा >>> “निवडणुका लढणार नाही, पण भाजप सरकारला…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

हा रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया झाली. या उपचारासाठी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. (प्रा.) एम. एच. राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. (प्रो.) सिद्धार्थ दुभाषी, डॉ. प्रवीण साळुंखे, डॉ. हेमंत बोधनकर, डॉ. फ्रैंकलीना पारगे, डॉ. अमरुषा रायपुरे, डॉ. सुचेता मेश्राम, डॉ. ओमशुभम असाई, डॉ. (प्रो.) अरिजीत कुमार घोष, डॉ. विजया लांजे आणि सर्व परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Open heart surgery now in aiims successful treatment of the first patient mnb 82 ysh

First published on: 03-10-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×