गडचिरोली : मतदानानंतर तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ४ जूनरोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थानी जाहीर केलेल्या सर्वेक्षणात गडचिरोली-चिमूर लोकसभेत काँग्रेसला झुकते माप दिले. परंतु सट्टा बाजारात भाजपला कमी भाव दिल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे लोकसभा क्षेत्र असलेल्या गडचिरोली-चिमूरमध्ये कोण विजयी होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चित्र स्पष्ट होण्यासाठी अवघ्या २४ तासाचा कालावधी शिल्लक असताना सट्टा बाजारात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना झुकते माप दिल्याने देशातील विविध संस्थानी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ‘एक्सिट पोल’मध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभेत काँग्रेस बाजी मारणार असे दाखविण्यात आले होते. तेव्हापासून दोन्ही गोटात अस्वस्था वाढली आहे.

Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”
Mayawati on Bhole baba
“बाबा-बुवांच्या नादी लागण्यापेक्षा आंबेडकर…”, हाथरस चेंगराचेंगरीनंतर मायावतींचे दलितांना आवाहन
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Increase in rent in the name of survey to houses in Vasai Allegation of MLA Rajesh Patil in Assembly
वसईतील घरांना सर्वेक्षणाच्या नावाखाली वाढीव घरपट्टी; आमदार राजेश पाटील यांचा विधानसभेत आरोप
maharashtra assembly monsoon session starts today
गोंधळाची चाहूल; विद्यामान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आजपासून
congress likely to contest at least 84 seats in maharashtra assembly elections
विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता
Navi Mumbai, Mahavikas Aghadi,
नवी मुंबईत महाविकास आघाडीचा मतटक्का वाढला

आणखी वाचा-वाशीम : ‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात; तीन जण ठार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टा बाजारात अशोक नेते यांना २० पैसे तर नामदेव किरसाण यांना १.२० पैसे इतका भाव देण्यात आला आहे. १९ एप्रिलरोजी पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा थोडे कमी परंतु राज्यात सर्वाधिक ७१. ८८ टक्के मतदान झाले. यंदा रींगणात एकूण १० उमेदवार उभे होते. त्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळाली. लोकसभेतील चिमूर, ब्रम्हपुरी विधानसभेत मतदानाचा टक्का सर्वाधिक होता. या जागेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवर यांनी देखील एकहाती खिंड लढवली. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष गडचिरोलीकडे लागून आहे.

एक लाखाहून अधिक मताधिक्याने येणार..!

निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षात अंतर्गत वाद चर्चेचा विषय होता. काँग्रेसच्या तर माजी आमदारासह तीन नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे काही भाजप नेत्यांनी अशोक नेते यांच्या विरोधात काम केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे. काँग्रेस नेते विजय वाडेट्टीवार आणि अशोक नेते या दोघांनीही एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच वाढली आहे