नागपूर : लहानपणापासूनच तुटलेला तारा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. वर्षांतील ठरलेल्या दिवशी उल्कापात बघणे ही एक अप्रतिम संधी असते. त्यासाठी शहरी वीजदिव्यांच्या प्रकाशापासून दूर काळोख गाठावा लागतो. जेमिनिड उल्कापात हा सहज खात्रीलायक दिसणारा सर्वाधिक तेजस्वी असून तो ३२०० फीथॉन या लघुग्रहाच्या कचऱ्यातून निर्माण होतो. तो उत्तर-पूर्व आकाशात जेमिनीड तारका समूहातून निघताना दिसतो. या उल्कापाताच्या साधारण दोन दिवस असलेल्या परमोच्च बिंदूपैकी येत्या १४ डिसेंबरला रात्री सात ते मध्यरात्रीपर्यंत दिसण्याची सर्वोत्तम शक्यता चंद्रोदय खूप आधी असल्याने राहील.

उल्कापात म्हणजे तारा तुटणे नसून अवकाशातील धूमकेतूच्या मागे राहिलेल्या तुकडय़ांच्या पट्टय़ातून पृथ्वी जात असताना तिच्याकडे गारगोटीएवढे लहान तुकडे वेगाने ओढले जातात. या तुकडय़ांचे वातावरणातील कणांसोबत घर्षण होऊन झळाळणारी प्रकाशरेषा म्हणजे उल्कापात आहे. फक्त काहीच तुकडे जुळून पृथ्वीवर पोहोचतात आणि त्या उल्का असतात. पृथ्वीपासून साधारणत: १०० किमी उंचीवर घडणारा उल्कापात त्याच्या पार्श्वभूमीवर करोडो किमी दूर असणाऱ्या विशिष्ट तारका समूहातून निघाल्यासारखा दिसतो व त्यावरून ओळखला जातो. पौर्णिमा किंवा पावसाळय़ात उल्कापात दिसत नाही. त्यादृष्टीने भारतात दिसण्यासाठी उत्तर गोलार्धात ठळक दिसणारे हिवाळय़ातील जेमिनिड आणि अॅ्क्वॉरिड उल्का वर्षांव अधिक महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये उल्का दिसण्याचा वेग सारखाच असला तरी जेमिनिडमधील उल्का अधिक तेजस्वी असतात. जेमिनिडपेक्षा किंचित कमी तेजस्वी असलेला क्वॉड्रान्टिड उल्का वर्षांवचा परमोच्च बिंदू (साधारणत: ताशी १००) काही तासांचाच (आठ) असल्याने तो गाठण्याची खात्री जेमिनिडपेक्षा कमी असते. तो येत्या चार जानेवारीला पहाटे पूर्वी १.३० नंतर सर्वोत्तम दिसण्याची शक्यता आहे. तो मध्यरात्री नंतर उत्तर-पूर्व आकाशात येणारा उसरा मेजर/ग्रेट बिअर तारका समूहचा भाग असलेल्या सप्तर्षीखालून निघतांना दिसेल.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
aarzoo khurana advocate and wildlife photographer documents Indias 55 tiger reserves
वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

ग्रहताऱ्यांची जीवनावरील परिणामांची अनाठाई भीती बाळगू नये. मात्र आपल्यावर प्रत्यक्ष परिणाम करणारे निसर्ग, ऊन, पाऊस, तापमान, हवा, वारे, ऋतू, प्रदूषण, वातावरण बदलांची समज वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक किमान प्राथमिक असे दिवस व रात्र खगोलशास्त्राची गोडी लागण्यास संवेदनांना स्पर्श करणारी अशी विज्ञानुभुती उपयुक्त ठरते. उल्कापाताची स्थानिक वेळ आणि अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक  ९८६००३९०१६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन अपूर्व विज्ञान मेळाचे श्याम रघुते यांनी केले आहे.