जनसंघर्ष समितीकडून वनमंत्री व पर्यावरणमंत्र्यांचा निषेध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अधिवास नसलेल्या पेंग्विनसाठी कोटय़वधीचा खर्च आणि अधिवास असलेल्या राज्यातील एकमेव ‘हत्ती कॅम्प’ साठी पैसे नसल्याचे कारण देत हत्तींचे स्थानांतरण करण्याच्या निर्णयावर जनसंघर्ष समितीने वनमंत्री व पर्यावरणमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमुळे गावाचा विकास झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा हत्ती कॅम्प उत्तम आणि सोयीस्कर आहे. नक्षल्यांचे माहेरघर असतानाही कमलापूरमध्ये हत्ती पाहण्यासाठी दुरून पर्यटक येतात. निसर्गाचे वरदान असलेल्या हत्ती कॅम्पवर नक्षल्यांनी हल्ला करत येथे नासधूस केली. तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत नक्षली निघून गेले. मात्र, त्यानंतर पुन्हा हा हत्ती कॅम्प नव्याने उभा राहिला. आता कमलापूरला वेगळे स्वरूप मिळाले असून पर्यटक न घाबरता कमलापुरात पोहचतात. कॅम्पच्या जवळ गाव असल्यामुळे खाद्यापदार्थाची दुकाने वाढून रोजगार वाढला आहे. गावकऱ्यांची नक्षल्यांप्रती भीती कमी झाली असून गावात वर्दळ वाढली आहे. हा गावाचा नाही तर देशाचा विजय आहे. युद्ध न करता हत्तीमार्फत नक्षल्यांना दिलेली ही मात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition elephant migration protest forest minister environment ysh
First published on: 26-01-2022 at 00:15 IST