scorecardresearch

Premium

यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक

केंद्र सरकार जातनिहाय जनगणा करण्याचे टाळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ओबीसी विरोधी असून त्यांचा जातनिहाय जनगणेला विरोध आहे अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Opposition leader, vijay wadettiwar, BJP, OBC census
यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक ( छायाचित्र सौजन्य – Vijay Wadettiwar FB page )

नागपूर : बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६३ टक्के लोक हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाचे असल्याचे जनगणनेतून समोर आले आहे. ही आकडेवारी जाहीर होताच महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा… बुलढाणा: खामगावात कथित ‘गजानन महाराज’ प्रगटले! तोतया की बहुरुपी?, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…

narendra modi Supriya sule
“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
sharad pawar
राष्ट्रवादीत फूट नाही! शरद पवार गटाचा युक्तिवाद; बहुसंख्य लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याचा अजित पवार गटाचा दावा
ncp leader sharad pawar, sharad pawar on founder of ncp, ncp founder, sharad pawar on ajit pawar
शरद पवार यांचे सूचक विधान, म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण…’
hunger strike against Jarange Patil
चंद्रपूर : जरांगे पाटलांच्या मागणीविरोधात अन्नत्याग आंदोलन, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचे उपोषण सुरू

हेही वाचा… कंत्राटी नोकर भरतीविरोधात आंदोलने, ८२१ जागांवर बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठ्याच्या शासन निर्णय

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून भाजपने आज सेवाग्राम येथून ओबीसी जागरण यात्रेला प्रारंभ केला. त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रहार केला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणेची मागणी केली. त्याशिवाय ओबीसींचे आकडेवारी समोर येऊ शकत नाही. पण, केंद्र सरकार जातनिहाय जनगणा करण्याचे टाळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ओबीसी विरोधी असून त्यांचा जातनिहाय जनगणेला विरोध आहे. केंद्र सरकार मनुवादी सरकार चालवणार की, बहुजनवादी असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. तसेच भाजपने ओबीसी जागरण यात्रा काढून लोकांची डोळ्यात धुळफेक करू नये., जातनिहाय जनगणेपासून पळ काढू नये, टीकाही त्यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition leader vijay wadettiwar criticizes bjp over obc census issue rbt 74 asj

First published on: 02-10-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×