लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरजवळील धामना गावातील चामुंडा कंपनीकडून मंत्र्यांचे काही नातेवाईक नागपुरात हप्ता वसुली करतात, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला.

नागपूरजवळील धामना गावातील दारूगोळाच्या चामुंडी कंपनीतील गुरूवारी स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनास्थळाला विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी भेट दिली असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, नागपूर धामणा येथील घटनेमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना परत्येकी २५ लाख रुपये तात्काळ मालकाकडून धनादेश मिळायला हवा.

आणखी वाचा-अमरावती : दुधात गुरांच्‍या हौदातील पाण्‍याची भेसळ! सीसीटीव्‍ही कॅमेरामुळे प्रकार उजेडात

कामगारांना मदत मिळेपर्यंत येथून मृतदेह उचलले जाणार नाही. या कंपनीमध्ये सरकारच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर महिन्याला भेट देऊन सुरक्षेची व्यवस्था केली जाते की नाही याची पाहणी करणे गरजेचे होते. परंतु या गंभीर गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. येथील कामगारांना कुठलाही प्रशिक्षण दिले गेले नाही. त्यामुळे अप्रशिक्षीत कामगारांकडून जोखमेचे काम केले जात होते. या कामगारांना अत्यल्प मोबजला दिला जात होता. या सगळ्या प्रकरणाची गांभीर चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात संबंधितांवर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल व्हायला हवा. या कंपनीत काही मंत्र्यांचे नातेवाईक नागपुरात हप्ता वसुली करतात, असाही गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी याप्रसंगी केला.

कामगारांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये मदत करा- अनील देशमुख

मृतकाच्या कुटुंबीयांना किमान ४५ लाख रुपयांची मदत मिळायला हवी. या प्रकरणात जर संबंधित कंपनीचा मालक मृत्यू झालेल्या कुटुंबियांना २५ लाख रुपये आर्थिक मदत देत असेल तर राज्य सरकारने मदतीची शिल्लक रक्कम वाढवून २० लाख रुपये करावी. येथे मृत्यू झालेल्या कामगाराच्या प्रत्येक कुटुंबियांना ४५ लाख रुपये मदत मिळायला हवी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आणखी वाचा-धक्कादायक! लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा चिनी मांजाने गळा चिरला

प्रकरण काय?

नागपूरजवळील धामना गावातील दारूगोळाच्या चामुंडी कंपनीतील गुरूवारी स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या कंपनीत फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कंपनीच अचानक स्फोट झाला. यात पाच महिलांसह सहा जणांचा भाजून मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी आहे. तिन्ही रुग्णांवर नागपुरातील रवीनगरच्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहे. दगावलेल्यांमध्ये प्रांजली मोदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०) यांचा समावेश आहे.