scorecardresearch

Premium

नागपूर : कोराडी वीज प्रकल्पाला विरोध, सुनावणी सुरू होण्यापूर्वीच तणाव; पोलीस बंदोबस्तात सुनावणी सुरू

सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाच्या सदस्यांनी मंच परिसरात प्रकल्पाला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.

Opposition to Koradi power plant
नागपूर : कोराडी वीज प्रकल्पाला विरोध, सुनावणी सुरू होण्यापूर्वीच तणाव; पोलीस बंदोबस्तात सुनावणी सुरू (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाची जनसुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सुरू झाली आहे. सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाच्या सदस्यांनी मंच परिसरात प्रकल्पाला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.

महानिर्मितीच्या कोराडी येथे ६६० मेगावॅटचे २ नवीन संच लावण्याचे प्रस्तावित आहे. त्याला प्रदूषणाच्या कारणावरून अनेक संघटनांचा विरोध आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रकल्प कोराडीत न करता पारशिवनीत स्थानांतरित करा, अशी विनंती केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व याच पक्षाचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – नागपूर : विद्युत प्रकल्पांमधील राख ही किरणोत्सर्गी तरीही लोकवस्तीजवळ प्रकल्पाचा अट्टाहास का ?

स्वंयसेवी संघटना, पर्यावरणवादी संघटनांचा प्रकल्पाला विरोध आहे. या सर्वांच्या विरोधानंतरही ही सुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सोमवारी भर दुपारी सुरू झाली. सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाचे सदस्य प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत मंच परिसरात गोळा झाले. त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने पर्यावरणवादी शांत झाले. ही घटना घडल्याच्या काही वेळानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुनावणी सुरू केली. येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सुनावणीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. येथे आमदार विकास ठाकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition to koradi power plant tension even before the start of the hearing mnb 82 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×