‘लंडन स्ट्रीट’च्या धर्तीवर उपराजधानीत वर्धा मार्ग ते हिंगणा मार्गाला जोडणाऱ्या जयताळा भागात उपराजधानीचे रूप पालटणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प महापालिकेने हाती घेतला होता. या प्रकल्पाचे स्वप्न जनतेला दाखविण्यात आले पण महापालिका निवडणुका सहा महिन्यानंतर होतानाही त्याला प्रारंभ करण्यात आला नाही. आता त्याचे पुन्हा एकदा नव्याने आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ असलेल्या भागातील ८५ एकर जागेवर होणारा ऑरेंज सिटी प्रकल्प हा नागपूरकरांसाठी तूर्तास तरी स्वप्न ठरणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने हा प्रकल्प ऑरेंज सिटी स्ट्रीट या नावाने बिओटी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकल्प जवळपास साडेतीन हजार कोटींचा आहे. या प्रकल्पात उपाहारगृह, रुग्णालय, क्लब हाऊस, क्रीडा संकुलासह निवासी संकुलाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांत प्रत्येक अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद केली जात होती. तसेच दरवर्षी त्याच्या आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात होते.
या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम मे. हफीज कॉन्ट्रक्टर यांच्याकडे देण्यात आले असता त्यांनी आराखडा तयार केला होता. दहा भागात एक विकासक काम करणार अशी निविदा प्रपत्रे तयार करण्यात आले होते आणि त्यासंबंधी कामही सुरू झाले होते. मात्र, मधल्या काळात याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या ऑरेंज सिटी प्रकल्पातील भामटी येथील रिकामी जमीन आणि वाठोडा येथील काही रिकामी जागा मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला कास्टिंग यार्डसाठी दिली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आराखडा बदलावा लागणार असून त्या दृष्टीने नव्याने प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद केली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढविणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांंपासून जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या जागेवर मोठय़ा प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा त्या ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती होते. सोमलवाडा या भागातून प्रकल्पाची सुरुवात होणार असली या सुरुवातीला त्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून २०० च्या जवळपास विक्रेते त्या ठिकाणी व्यवसाय करीत असतात. अनेकांनी त्या जागांवर अतिक्रमण केले आहे. याशिवाय पानटपरी, नास्ता केंद्र सुरू केले आहे. प्रकल्पाचा शेवटचा टप्पा जयताळा आहे. या प्रकल्पाची निवडणुकीपूर्वी सुरुवात होणार की पुन्हा एकदा हा प्रकल्प स्वप्नवत ठरणार आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.

ऑरेंज सिटी प्रकल्पाबाबत आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रकल्प मोठा असल्यामुळे आणि वेगवेगळ्या कंत्राटदारांना त्याचे काम देण्यात येणार असल्यामुळे वेळ लागणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शहरातील सुरेश भट सभागृहासह अनेक प्रकल्प निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू व्हावे किंवा मार्गी लागावे, असा प्रयत्न केला जाणार आहे.
सुधीर राऊत, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका.

Metro 1 route soon to MMRDA Bankruptcy petition against MMOPL disposed
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
Cyber Fraud Mumbai crime Cases
जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल