बैतुलच्या तरुणाचे हृदय मुंबईच्या तरुणाला! विविध अवयव प्रत्यारोपणातून चौघांना जीवदान

विजय शिवनारायण घंगारे (२७) रा. जोगळी, जि. बैतुल, मध्यप्रदेश असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे.

नागपूर : अपघातातील अत्यवस्थ मध्यप्रदेशच्या बैतुल येथील तरुणाचा उपचारादरम्यान मेंदूमृत झाल्याचे नागपुरात निदर्शनास आले. कुटुंबाने अवयव दानाला होकार देताच हृदय मुंबईत तर दोन मूत्रपिंड व यकृताचे विविध रुग्णालयात चार वेगवेगळ्या रुग्णात प्रत्यारोपण केल्यानेचौघांना जीवदान मिळाले.

विजय शिवनारायण घंगारे (२७) रा. जोगळी, जि. बैतुल, मध्यप्रदेश असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. तो शेतकरी होता. त्याचा शेतातून  परतताना १५ ऑक्टोबरला अपघात झाला. मेंदूला गंभीर इजा असल्याने नातेवाईकांनी प्रथम त्याला बैतुलच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर १९ ऑक्टोबरला नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान २० ऑक्टोबरला त्याचा मेंदूमृत झाल्याचे समोर आले. अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते, समन्वयक विना वाठोडे यांनी लगेच नातेवाईकांचे समुपदेशन केले. कुटुंबाने होकार देताच गरजू रुग्णांचा शोध सुरू झाला. दरम्यान, मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयातील एक १८ वर्षीय तरुण हृदयाच्या, वोक्हार्टचा एक ६० वर्षीय पुरुष मूत्रपिंड, केअर रुग्णालयातील एक २८ वर्षीय तरुण मूत्रपिंडाच्या, किंग्जवे रुग्णालयातील एक ३० वर्षीय महिला यकृताच्या प्रतीक्षेत होते. तातडीने कायदेशीर प्रक्रिया करत ग्रीन कॅरिडोरने हे अवयव दानदात्या रुग्णाच्या शरीरातून काढत विविध रुग्णालयांत पोहचवून संबंधित रुग्णात प्रत्यारोपित केले गेले. मुंबईला विशेष विमानाने हृदय पाठवल्याने वेळीत त्याचे प्रत्यारोपण झाले.

वर्षांतील दहावे अवयवदान

करोनामुळे मेंदूमृत रुग्णाकडून होणारे अवयवदान कमी झाले होते. परंतु यावर्षी या तरुणाच्या अवयवदानामुळे पुन्हा १० मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाल्याने काही प्रमाणात अवयवदान वाढताना दिसत आहे. दरम्यान, आजपर्यंत नागपूर विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्राच्या अखत्यारित ७७ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Organs of brain dead man help save lives of four people zws

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या