नागपूर : हल्ली विविध माॅल्स, कार्यालयात बऱ्याच ठिकाणी डोळ्याच्या मदतीने (बायोमेट्रिक) कर्मचाऱ्यांची हजेरी लागते. लवकरच एका विशिष्ट यंत्राच्या मदतीने डोळ्यांच्या पडद्याचे स्कॅनिंग करून त्यातील रक्तवाहिनीतील बदलातून या व्यक्तीच्या भविष्यातील आजारांची माहिती जाणता येईल, असे मत सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आणि सेंटर फाॅर साईटचे प्रमुख पद्मश्री डॉ. महिपाल सचदेव यांनी व्यक्त केले. हेही वाचा - आरक्षणात वाटेकरी नको… ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’च्या उपोषणाला नागपुरात सुरुवात हेही वाचा - चार दिवसांनी घरचा चहा प्यायले! मुलीने किराणा ऑनलाईनद्वारे पाठवला; पूरग्रस्तांची व्यथा नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे बुधवारी आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डाॅ. महिपाल सचदेव पुढे म्हणाले, सध्या डोळ्यांचे स्कॅन प्रत्येकच ठिकाणी होतात. परंतु भविष्यात माॅल्स अथवा मोठ्या ठिकाणी फंगस कॅमेरा सदृष्य यंत्रातून मानवी डोळ्यातील पडद्याचे छायाचित्र घेतल्यास त्यातील विविध रक्तवाहिनींमधील बदल अथवा इतर बदलांच्या अभ्यासातून संबंधित व्यक्तीमधील ह्रदयविकार, मुत्रपिंड विकार, काही प्रकारचे कर्करोगासह इतरही अनेक आजारांचे निदान होणे शक्य आहे. त्याबद्दल आयआयटी, गुगल, सेंटर फाॅर साईटसह इतर संस्थांच्या मदतीने संशोधनही सुरू आहे. त्यात एखाद्या आजाराने डोळ्यांतील पडद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये काय बदल बघायला मिळतात, हे संग्रहितही केले जात आहे. पत्रकार परिषदेला डॉ. अजय अंबाडे उपस्थित होते.