ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांसाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढेच या प्रकल्पावरील व्यवस्थापनाची पकड मात्र ढिली होत चालली आहे. पर्यटकांचा अनियंत्रित वाढता ओघ या व्याघ्रप्रकल्पासाठी मारक ठरणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली पद्मापूर मार्गाने जाताना दोन चारचाकी वाहने ताडोबा बफर सफरीच्या रस्त्यावर थांबली. त्यातील पर्यटक खाली उतरून मोठ्या आवाजात गाणी लावून पार्टी करत असल्याचे स्थानिक पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली. वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भर दिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो, आशा संवेदनशील परिसरात वाहनाखाली उतरून मोठमोठ्याने गाणी वाजवून पार्टी करणे म्हणजे वाघाच्या तोंडी आयता घास देण्यासारखे आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: मातोश्री वृद्धाश्रम सेवाभाव मुळेच उभे; वृद्धाश्रमाला ५० लक्ष रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू- उपमुख्यमंत्री फडणवीस

हेही वाचा – नागपूर : नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या महिलेला ध्वजारोहणाचा सन्मान, रायपूर ग्रामपंचायतीचे सकारात्मक पाऊल

या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या या वाहनचालकांकडून पाच हजार रुपये दंड आकारला व त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले. मात्र, दंड आकारून हा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला. या घटनेने ताडोबातील अनियंत्रित पर्यटनावर प्रशासनाची पकड ढिली झाल्याचे दिसून आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party held in the tiger habitat songs were played incident in the tadoba andhari tiger area nagpur rgc 76 ssb
First published on: 27-01-2023 at 09:35 IST