चंद्रपूर : भद्रावती शहरातील वनविभागाच्या अधिवासात असलेला राष्ट्रीय पक्षी मोराचा आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक जुना बस स्थानकावरील शकील चिकन सेंटर जवळील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या ११ केवी वीज प्रवाहाला स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे भद्रावती शहरांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा >>> चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शिंदे यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आली. वन विभागाच्या चमने घटनास्थळी येऊन विद्युत तारेला लटकलेला मोराच्या प्रेताची सुटका केली. दरम्यान शहरातील आबाला वृद्धांनी घटनास्थळी मोराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. गर्दी शमविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा >>> Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…

“जंगल मे मोर नाचा… किसने देखा… किसने देखा..!” अशा वर्णनाचे जुन्या जमान्यातील हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गीत त्यावेळेस सर्वांच्या तोंडी होते. पूर्वी जंगलात नाचणारा मोर आता चक्क भद्रावती शहराच्या मध्यवर्ती वस्तीत वास्तव्यास होता. तो आपल्या अदाकारीने आबाल वृद्धांना भुरळ घालीत होता.

शहराच्या मध्यभागी असलेल्या वनविभागाच्या कार्यालयात त्याचे वास्तव्य होते. तो भद्रावती शहर हा आपला अधिवास समजू लागला होता.मानवी जीवनाला आपलसं करून त्यांचे सोबत तो आनंदाने राहू लागला. हा मोर भद्रावती शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्वांना भुरळ घालीत आहे. त्याच्या आवाजाने तो आपल्या अस्तित्वाची सर्वांना जाणीव करून देत होता. त्याच्या या आवाजाने रस्त्याने चालणारा पादचारी आणि वाहनधारक काही वेळ थांबून त्याला न्याहाळत बसत होते आणि त्याची छबी सोबतच्या मोबाईल मध्ये फोटो व चित्रफित द्वारे आपल्याकडे ठेवा म्हणून सामावून घेत होते. असा हा सर्वांना भुरळ पाडणारा वन विभाग परिसरातच आपलं वास्तव्य समजू लागला होता.